15.1 C
New York

Pahalgam Attack : ‘शिवरायांच्या भूमीतले आपण’… नेहा वाघुळदेनी प्रेरणादायी संदेश देत पर्यटकांना दिला धीर

Published:

काल २२ एप्रिलला दुपारी २:३० च्या सुमारास, बैसारण मेडो येथे ४ ते ६ (Pahalgam Attack) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. हे ठिकाण पाहलगामपासून ५ किमी अंतरावर आहे आणि तिथे केवळ पायी किंवा घोड्यावरूनच पोहोचता येतं, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांना तिथे तातडीने पोहोचणं कठीण होतं. दहशतवाद्यांनी जवळून गोळीबार केला, आणि प्रत्यक्षदर्शींनुसार, त्यांनी पर्यटकांचे नाव आणि धर्म विचारून गैर-मुस्लिमांना लक्ष्य केलं. काहींना त्यांनी जवळून गोळ्या घातल्या, तर एका महिलेला जिवंत सोडलं, जेणेकरून ती या हल्ल्याची भीषणता जगाला सांगू शकेल. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचाही समावेश आहे. यात डोंबिवलीच्या तिघांचा, पुण्याच्या दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा समावेश आहे.

याच दरम्यान, जळगावचे पत्रकार तुषार वाघुळदे यांच्या पत्नी नेहा वाघुळदे आपल्या मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी काश्मीरमध्ये होत्या. हल्ल्याच्या वेळी नेहा वाघुळदे यांनी दुपारी साडेचारच्या सुमारास पतीला फोन करून सांगितले होते की, लष्कराच्या जवानांनी त्यांना सुरक्षित घेरले आहे. त्यानंतर तब्बल पाच तास त्यांचा कोणताही संपर्क झाला नव्हता, ज्यामुळे तणाव वाढला होता. अखेर रात्री साडेनऊ वाजता नेहाचा पती तुषार यांच्याशी संपर्क झाला आणि सुखद बातमी मिळाली की नेहा आणि तिच्या मैत्रिणी सुरक्षित आहेत. नेहाने सांगितले की अचानक फायरिंग सुरू झाल्यावर लष्कराच्या जवानांनी सर्व पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आणि तिथेच रात्रीचा मुक्काम केला. नेहा वाघुळदे, स्वतः एक कौन्सिलर असल्याने, इतर पर्यटकांना धीर देत होती. तिने सर्वांना आठवण करून दिले की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले आहोत आणि या शब्दांनी सर्वांमध्ये धैर्य निर्माण झाले. सध्या नेहा आणि तिच्या ग्रुपमधील मैत्रिणी कटरा येथे माता वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी पोहोचल्या आहेत आणि तिथून त्यांच्या प्रवासाला पुढे सुरुवात करणार आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img