17.1 C
New York

Muslim Community : कर्नाटकातील जात सर्वेक्षणाचे धक्कादायक निष्कर्ष समोर

Published:

धरतीवरचं स्वर्ग’ म्हणून ओळखलं जाणारं काश्मीर पुन्हा एकदा दहशतीच्या सावटाखाली गेलंय, (Muslim Community) आणि निष्पाप पर्यटकांना लक्ष्य केल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. त्यातच आता कर्नाटकात सध्या जात जनगणनेचा मुद्दा गाजतो आहे. २०१५ मध्ये झालेल्या कांतराजू आयोगाच्या सर्वेक्षणातील काही महत्त्वाचे आकडे लीक झाले आहेत, आणि त्यामुळे राज्यात मोठा गोंधळ माजला आहे.

या अहवालानुसार, गेल्या ३० वर्षांत मुस्लिम लोकसंख्येत तब्बल ९४ टक्के वाढ झाली आहे. तसंच अनुसूचित जातींची (SC) लोकसंख्याही ९० टक्क्यांनी वाढली आहे. पूर्वी १९८४ मध्ये वेंकटस्वामी आयोगाच्या सर्वेक्षणात वीरशैव लिंगायत (Veerashaiva Lingayat) समुदाय सर्वात मोठा गट होता — त्यांची लोकसंख्या ६१ लाख होती. मात्र, आता २०१५ च्या सर्वेक्षणानुसार, लिंगायतांचा वाढीचा दर केवळ ८.५० टक्के राहिल्याने ते तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. त्यांच्या लोकसंख्येचा वाटा राज्यात फक्त ११ टक्के उरला आहे.

अनुसूचित जाती (SC) – सर्वात मोठा समुदाय आहे. मुस्लिम दुसऱ्या क्रमांकावर तर लिंगायत – तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर वक्कलिग, कुरुब आणि ब्राह्मण समुदाय आहेत. १९८४ मध्ये मुसलमानांची संख्या ३९ लाख होती, जी आता वाढून ७६ लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळे विरोधी पक्ष विचारत आहेत की, मुस्लिमांची लोकसंख्या एवढ्या झपाट्याने वाढली असताना इतर समुदायांची वाढ का थांबली? या सर्वेक्षणातून अनेक ‘शक्तिशाली’ समुदायाच्या नेत्यांना धक्का बसला आहे, कारण त्यांच्या अपेक्षेपेक्षा आकडे बदलले आहेत. त्यामुळे यावरून राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img