जम्मू-काश्मीरमध्ये काल मंगळवार (दि. २२ एप्रिल)रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. सहा लोकांना (Attack) यामध्ये महाराष्ट्राताली जीव गमवावा लागला आहे. हे पार्थिव वेगवेगळ्या विमानाने येणार आहेत. सर्व स्थरावर त्यासाठी मंत्री काम करत आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
याचबरोबर मंत्री गिरीष महाजन पहलगामला जात आहेत. तीथ जे लोक आहेत त्यांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळही संपर्कात आहेत. त्यांना विषेश विमानांची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर ज्या लोकांनी आम्हाला कळवलं आहे की आम्हाला मदत हवी आहे त्या सर्वांना मदत देण्याचं काम आम्ही करत आहोत असंही फडणवीस म्हणाले आहेत.
Devendra Fadnavis या मंत्र्यांवर जबाबदारी
राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे दुपारी २.३० आणि सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ वर उपस्थित राहतील. योगेश कदम हे मृतांच्या पार्थिवांना त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कारासाठी पाठवण्याची व्यवस्था करतील. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. ते स्वतः सर्व यंत्रणांशी समन्वय साधत आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर आणि त्यांची टीम काल रात्रीच श्रीनगरला पोहोचली आहे. जेणेकरून तेथील पार्थिव आणि नातेवाईकांना विमानात बसवण्याची व्यवस्था करतील.
हे समन्वयासाठी मंत्री गुलाबराव पाटील आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण हे देखील मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. पहलगाम हल्ल्यातील मृतांमध्ये डोंबिवलीतील तीन जणांचा समावेश आहे. रविंद्र चव्हाण कालपासून त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात आहेत. ते डोंबिवलीतील तिन्ही पर्यटकांचे पार्थिव घेऊन डोंबिवलीला रवाना होणार असून संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मदत करत आहेत.