17.1 C
New York

Pahalgam Terror Attack : …देशावर मेहेरबानी करा, राऊतांकडून अमित शहांवर निशाणा

Published:

दक्षिण काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये बैसरन खोऱ्यात मंगळवारी (Pahalgam Terror Attack) दुपारी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आतापर्यंत मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या मृतांमध्ये या महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्याने संपू्र्ण देश हादरला आहे. धक्कादायक म्हणजे पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या झाडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने श्रीनगरमध्ये दाखल होऊन त्यांनी संबंधित यंत्रणांची बैठक घेतली. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राजीनामा द्या आणि देशावर मेहरबानी करा, असे त्यांनी म्हटले आहे. (Pahalgam Terror Attack: Sanjay Raut demands Amit Shah’s resignation)

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुरुवातीला दोन पर्यटकांचा मृत्यू आणि 12 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. पण नंतर 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. सुरक्षा दल आणि वैद्यकीय पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. पहलगाम येथील बैसरन खोऱ्यातील एका रिसॉर्टवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे सांगण्यात येते. दहशतवाद्यांनी गोळीबार केलेले पर्यटक वेगवेगळ्या राज्यातील आहेत. या पर्यटकांचे नाव आणि धर्म विचारून मग त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने लगेच शोधमोहीम हाीत घेतली असून सीआरपीएफसोबतच शीघ्र कृती दलाला देखील पाचारण करण्यात आले आहे.

या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत आहेत. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजूट होऊन उभा आहे. पण आता सरकारने जम्मू-काश्मिरमधील परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करू नयेत. उलट, या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ठोस पावले उचलावीत. ज्यायोगे अशा निषेधार्ह आणि निर्घृण घटना पुन्हा घडणार नाहीत आणि निष्पाप भारतीयांना आपला जीव गमवावा लागणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

तर, शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अमित शहा हे कायम सरकार स्थापन करण्यात आणि पाडण्यात मग्न असतात. तसेच, त्यांच्या डोक्यात 365 दिवस राजकीय विरोधकांना संपवण्याचे कटकारस्थान शिजत असते. दुसरीकडे लोकांची सुरक्षा तर रामभरोसेच आहे. आता रामही या लोकांना कंटाळला आहे. (अब राम भी ऊब चुका है इन लोगों से!) त्यामुळे राजीनामा द्या आणि देशावर मेहेरबानी करा, असे त्यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img