14.1 C
New York

Pahalgam Terrorist Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला संपूर्णपणे भारत सरकार जबाबदार, पाकिस्तानचे गंभीर आरोप

Published:

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terrorist Attack) आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. संपूर्ण देशात दहशतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत हा हल्ला कोणी केला, असा प्रश्न उपस्थित होतो. देशभरातून जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निषेध व्यक्त होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक देशांच्या प्रमुखांची प्रतिक्रिया आली आहे. या क्रुर हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना पहलगाममधील लष्कर-ए-तोयबाच्या द रेझिस्टन्स फ्रंट या गटाने घेतली आहे. पाकिस्तानाचीही पहिली प्रतिक्रिया या हल्ल्यावर आता समोर आली आहे.

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दहशतवादी हल्ल्याशी आपल्या देशाचा काहीही संबंध नसल्याचे सांगतिले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती आसिफ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारताकडून या हल्ल्यामागे पाकिस्तानाचा हात असल्याबाबत अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. त्याआधीच पाकिस्तानी मंत्र्यांनी हात वर केले आहेत. तसेच भारतावरच गंभीर आरोप केले आहेत.

भारत सरकार नागरिकांच्या हक्कांची हत्या करत आहे. ती त्यांचे शोषण करत आहे. म्हणूनच लोक त्याच्या विरोधात उभे आहेत. भारतीय सरकार अल्पसंख्याकांना त्रास देत आहे, असं पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी या हल्ल्याबाबत वादग्रस्त विधान केलंय. त्यांनी म्हटले आहे की, आमचा पहलगाममध्ये घडलेल्या अशा घटनेशी काहीही संबंध नाही. मी अशा हल्ल्यांचा निषेध करतो. विशेषतः नागरिकांवर असे हल्ले होऊ नयेत.

संरक्षण मंत्री ख्वाजा पुढे म्हणाले की, भारताचे सध्याचे सरकार तेथे राहणाऱ्या अल्पसंख्याकांना त्रास देत आहे. यामध्ये बौद्ध, ख्रिश्चन आणि मुस्लिम यांचा समावेश आहे. लोकांची कत्तल केली जात आहे. लोक याविरुद्ध आवाज उठवत आहेत. आम्ही दहशतवादाला अजिबात पाठिंबा देत नाही. याला संपूर्णपणे भारत सरकार जबाबदार आहे. हिंदुत्वावादी हुकुमशाहीविरूद्ध हे पाऊल अल्पसंख्यांक गटाकडून उचललं गेलंय, असं त्यांनी म्हटलंय.या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे एक विधान चर्चेचा विषय बनले आहे. सुमारे एक आठवड्यापूर्वी त्यांनी काश्मीरला त्यांच्या देशाची जीवनरेखा असल्याचे वर्णन केले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img