रियल इस्टेट फर्मशी संबंधित प्रकरणात ईडीकडून तपास केला जात आहे. हा तपास सुरू असतानाच साऊथ सिनेमातील सुपरस्टार महेश बाबूला ईडीची (Mahesh Babu) नोटीस मिळाली आहे. साईसूर्या डेव्हलपर्स आणि सुराणा प्रोजेक्ट प्रकरणी येत्या 28 एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. महेशबाबूने दोन्ही कंपन्यांसाठी ब्रँड अम्बेसेडर म्हणून काम केले आहे. या कामासाठी महेशबाबूंना 5.9 कोटी रुपये मिळाल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
सुराणा ग्रुप आणि साईसूर्या डेव्हलपर्स हैदराबादमधील नामांकित कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्यांवर ईडीने छापे टाकले होते. या छाप्यात अनेक महत्वाची कागदपत्रे ईडीने जप्त केली. साईसूर्या डेव्हलपर्स कंपनीचे मालक सतीशचंद्र गुप्ता हैदराबादमधील प्रतिष्ठीत बांधकाम व्यावसायिक आहेत. ग्रीन मीडोजच्या एका प्रकल्पात गुंतवणूकदाराा धोका दिल्याप्रकरणी त्यांच्यावर खटला दाखल आहे.
Mahesh Babu महेशबाबूला 5.9 कोटी मिळाले
ग्रीन मीडोज प्रोजेक्टसाठी महेश बाबूला कंपनीने ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले होते. यासाठी अभिनेत्याला 5.9 कोटी रुपयेही मिळाले होते. 123 तेलुगू रिपोर्टनुसार या रकमेतील 3.4 कोटी रुपये चेकच्या माध्यमातून तर 2.5 कोटी रुपये कॅश स्वरुपात देण्यात आले होते. या प्रकरणात ईडीचा तपास मनी लाँड्रिंग नेटवर्कशी संबंधित आहे. अनऑथराइज्ड लेआउट्सच्या प्लॉट्सची अनेकदा विक्री आणि फेक रजिस्ट्रेशनची गॅंरटी दिली म्हणून तेलंगाणा पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Mahesh Babu लोकांनी विश्वास केला
महेशबाबूला ब्रँड अॅम्बेसेडर केल्याने लोकांचा विश्वास वाढला. यामुळे या प्रोजेक्टमध्ये जास्तीत जास्त लोकांनी प्लॉट खरेदी करण्यात रस दाखवला. या सर्वच सामान्य नागरिकांची एक प्रकारे फसवणूकच झाली आहे. या फसवणुकीच्या प्रकरणात अभिनेत्याचा सहभाग आहे का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे तपासात आणखी काय माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.