गेल्या काही काळापासून मुंबई महापालिका निवडणुकीचे वेध राजकीय पक्षांसह नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्तेंना लागले आहेत. मात्र अद्यापही मुंबई महापालिका निवडणुकीच्या घोषणा होताना दिसत नाही. (MNS) सध्या मुंबई महानगरपालिकेचा कारभार प्रशासनाच्या वतीने चालवण्यात येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईतील समस्यांवर चर्चा करण्यासाठी “प्रतिपालिका सभागृह” भरवण्यात येणार आहे. या प्रतिसभागृहासाठी शिवसेना ठाकरे गटाचे युवा आमदार आदित्य ठाकरेंसह मुंबईतील इतर पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. (MNS to hold municipal hall in Mumbai)
महापालिका सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे मुंबईतील समस्यांवर चर्चा करण्यासाठी 26 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबई महापालिकेच्या समोरील पत्रकार भवन येथे मनसेकडून पहिले ‘प्रतिसभागृह” भरवण्यात येणार आहे. मनसेच्या या प्रतिपालिका सभागृहात प्रति महापौरही असणार आहे. मनसे आमंत्रण पत्रात म्हटले की, मुंबई महानगरपालिका ही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोन चाकांवर चालते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून यातील लोकयतिनिधी हे चाक बंद झाले आहे. परंतु मुंबईत अनेक समस्या आहेत, ज्यावर चर्चा व्हावी, मार्ग निघावा अशी जनभावना आहे. पण महापालिका सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे यावर चर्चा होताना दिसत नाही. त्यामुळे या सर्व प्रश्नांवर चर्चा पडवून आणण्यासाठी आम्ही प्रतिसभागृहाची संकल्पना मांडत आहोत. ज्यामध्ये विविध राजकीय संकटना, राजकीय प्रतिनिधी यांनी सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फुटावी, महानगरपालिका प्रशासनाला या प्रश्नांची जाणीव व्हावी व त्यावर मार्ग निघावा यासाठी हे चर्चेचे व्यासपीठ आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून फक्त नागरिकांच्या समस्यांवर चर्चा व्हावी हा आमचा उद्देश आहे, असे मनसेने म्हटले आहे.
MNS प्रति सभागृहासाठी या राजकीय पक्षांना आमंत्रण
भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत, शिवसेना ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राखी जाधव, काँग्रेस पक्षाच्या खासदार वर्षा गायकवााड, समाजवादी पक्षाचे नेते सईसभाई शेख आणि इतर पक्षाच्या प्रमुखांना मनसेच्या वतीने प्रति सभागृहासाठी आमंत्रण पाठवण्यात आले आहे. मनसेच्या प्रति सभागृहात त्यामुळे आता कोणते नेते उपस्थित होतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.