24.1 C
New York

Maharashtra politics : राज ठाकरेंच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंचा ‘ग्रीन सिग्नल’

Published:

महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे असं बऱ्याचदा बोललं जातं. (maharashtra politics) राजकीय कार्यक्रमात नेतमंडळींकडून आणि सर्वसामान्यांच्या तोंडून सहज हे वाक्य ऐकायला मिळतं. पण असं असलं तरी सध्या राज्याचं राजकारण एक वेगळं वळण घेण्याची शक्यता आहे. कारण सध्या राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चा रंगली आहे. या चर्चेला कारणही तसंच आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याबाबत वक्तव्य केलं आहे. (Raj Thackeray on Uddhav Thackeray can raj and uddhav thackeray come together in maharashtra politics news in marathi)

मागील काळात राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचं आणि अनैसर्गिक युतीचं गणित जुळलं आहे. त्यानुसार भाजप-शिवसेना युती तुटून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची या तीन पक्षांची अनैसर्गिक युती झाली. कालांतराने शिवसेनेत बंड झाला आणि पुन्हा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेना-भाजपची युती झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आणि अजित पवारांनी भाजप-शिवसेनेसोबत हात मिळवणी करत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, या सगळ्यात राज्यातील जनता राजकारणाकडे पाठ फिरवताना पाहायला मिळाली. अशात दुसरीकडे राजकारणात झालेला हा चिखल दूर करण्यासाठी ठाकरे बंधुंनी एकत्र यावं अशीही चर्चा रंगू लागली. राज्यातील सामान्य कार्यकर्त्यांनी दोन्ही ठाकरेंनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. त्यानंतर आता स्वत: राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं आहे.

maharashtra politics काय म्हणाले राज ठाकरे?

प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान ठाकरे बंधू एकत्र येण्यावर राज ठाकरे यांनी दिलखुलास भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अजूनही एकत्र येऊ शकतात का? असा थेट सवाल महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांना विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी “कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडणं किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं यात फार कठीण गोष्ट वाटत नाही. विषय फक्त इच्छेचा आहे, कारण हा माझ्या एकट्याचा विषय नाही. माझं म्हणणं आहे की सर्व राजकीय पक्षातील सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा”, असं उत्तर दिलं.

याशिवाय, “एकनाथ शिंदेंचं राजकारण वेगळं आणि मी शिवसेनेतून बाहेर पडलो हे वेगळं. आमदार तेव्हा माझ्याकडेही आले होते. हे मलाही तेव्हा सहज शक्य होतं. पण बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार हा माझा विचार होता. मी बाहेर पडलो त्यावेळेचा हा माझा विचार आहे. पण मी शिवसेनेत होतो तेव्हा उद्धवबरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. पण समोरच्याच्या मनात आहे का, मी त्यांच्याबरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा असेल तर महाराष्ट्राने जाऊन सांगावं. अशा लहान-मोठ्या गोष्टींत मी माझा इगो आणत नाही”, असंही राज ठाकरे म्हणाले.

परंतु, राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा टाळी दिली आहे का, असा सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांना घेऊन शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने एकत्र यावं, अशी भूमिका आतापर्यंत अनेकांनी जाहीरपणे व्यक्त केली. राज्यातील सामान्य कार्यकर्त्यांनी दोन्ही ठाकरेंनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. मात्र, एकत्र येण्याच्या या चर्चेवर भाष्य करण्यास दोन्ही ठाकरेंनीही कायम टाळाटाळ केली. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img