23.1 C
New York

Mega Block : मुंबईकरांचे होणार ‘मेगा’हाल, रविवारी तब्बल इतक्या लोकल रद्द!

Published:

रविवार हा सुट्टीचा दिवस असतो. या दिवशी मुंबईकरांसह उपनगरातील सर्वजण (Mega Block) रविवारच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडतात. साधारण रस्ते वाहतूक परवडणारी नसते. त्यामुळे सामान्य मुंबईकर लोकल प्रवासाला प्रधान्य देतो. मात्र, सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. त्यानुसार, उद्या म्हणजे रविवार 20 एप्रिल रोजी लोकलनं प्रवास करण्याच्या विचारात असाल तर जरा थांबा. कारण रविवारी रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. (Mega Block On Western Railway Central Railway And Trans Harbor Railway Line Some Locals May Cancelled)

शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत मध्य, पश्चिम आणि ट्रान्स हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मध्ये रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार, ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरूळ या स्थानकांदरम्यान रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. तसेच, पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते मरीन लाइन्स या दरम्यान ब्लॉक घोषित केला आहे. या ब्लॉकच्या कालावधीत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

Mega Block आता सविस्तर जाणून घेऊयात कोणत्या मार्गावर कधी मेगाब्लॉक असेल?

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार या स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. अप आणि डाउन धीम्या मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार या दोन्ही स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

ब्लॉकच्या कालावधीत अप आणि डाउन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाउन डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे प्लॉटफॉर्म उपलब्ध नसल्याने करी रोड, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि मशिद स्थानकांवर लोकल उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे काही फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

ट्रान्स हार्बर रेल्वे

ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी/नेरूळ स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घोषिक करण्यात आला आहे. या स्थानकादरम्यान अप आणि डाउन मार्गावर रविवारी सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या वेळेत मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

या ब्लॉकच्या कालावधीत ठाणे ते वाशी / नेरूळ / पनवेल मार्गावरील अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. कोणताही ब्लॉक हार्बर मार्गावर नसल्याने या मार्गावरील लोकल वेळापत्रकानुसार धावणार आहेत.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मरीन लाइन्स या स्थानकादरम्यान शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. चर्चगेट आणि मरिन लाइन्स स्थानकादरम्यान असलेल्या वानखेडे पादचारी पुलाचा दक्षिण दिशेचा गर्डर उभारण्यासाठी शनिवारी 19 एप्रिलला मध्यरात्री 1.15 ते रविवारी पहाटे 4.15 पर्यंत पश्चिम रेल्वेने विशेष रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे. बोरिवली-चर्चगेट आणि रविवारी पहाटे 4.38ची चर्चगेट-बोरिवली लोकल शनिवारी रात्री 8.50ची रद्द राहणार आहेत. काही लोकल फेऱ्या अंशत: रद्द राहणार आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img