17 C
New York

Rejects Kasle  : रणजित कासले यांनी केलेले खळबजनक दावे महाराष्ट्र निवडणूक आयोगाने फेटाळले; वाचा

Published:

महाराष्ट्र निवडणूक आयोगाने रणजित कासले (Rejects Kasle ) यांचे दावे फेटाळले आहेत. रणजीत कासले यांनी निवडणुकीदरम्यान दहा लाख रुपये आपल्या अकाउंट वर जमा करण्यात आले असल्याचा दावा केला होता. धनंजय मुंडे यांनी ईव्हीएमच्या आसपास फिरकू नये यासाठी दहा लाख रुपये दिले असल्याचा आरोप रणजीत कासले यांनी केला होता

Rejects Kasle  निवडणूक आयोगाचा खुलासा काय?

2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांना कोणत्याही प्रकारची निवडणूक ड्युटी लावण्यात आली नव्हती. विधानसभा निवडणुकी दरम्यान त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा राबवण्यात आली होती. केंद्रीय दल, राज्य राखीव पोलीस आणि जिल्हा पोलिसांसह मजबूत त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणेने स्ट्राँग रूमच्या सुरक्षात दैनात होती.

निवडणूक प्रक्रिया 24 तास सीसीटीव्हीच्या निरीक्षणात होती. तसंच, अधिक पारदर्शकता आणण्यासाठी राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी तैनात होते. हे दावे/आरोप बिनबुडाचे, निराधार, दिशाभूल करणारे आणि निवडणूक प्रक्रियेवर अवास्तव शंका निर्माण करण्याच्या उद्देशाने आहेत, बीड जिल्हाधिकारी आणि एसपी यांच्या अहवालांनी याची पुष्टी केली आहे. निवडणूक निष्पक्ष, शांततेत आणि पूर्णपणे सुरक्षित पद्धतीने पार पडली असं त्यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img