राज्यात सध्या मराठी भाषिक आणि हिंदी भाषकांत वाद होत आहेत. मराठी कुटुंबांना हिंदी भाषकांकडून मारहाण झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. यातच आता राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्तीचा निर्णय घेतला आहे. यावरून विरोधकांना महायुती सरकावर टीकेची झोड उठवली आहे. यातच आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) थेट आव्हानच दिले. फडणवीसांना सांगतो, तुमचे जे कुणी जोशी की माशी घाटकोपरमध्ये बोलले होते आता त्या घाटकोपरमध्ये मराठी सक्ती करुन दाखवा असे आव्हान उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिले.
Uddhav Thackeray हिंदीची सक्ती कशासाठी?
मुंबईत आज भारतीय कामगार सेनेच्या 57 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होत. या सभेत उद्धव ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ठाकरे म्हणाले, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन आणि मी पुन्हा मतदान करील. आम्ही प्रेमाने सगळं काही ऐकू. पण जर सक्ती कराल तर तुमच्यासह उखडून फेकू. हिंदीची सक्ती कशासाठी असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
Uddhav Thackerayघाटकोपरमध्ये मराठी सक्ती करुन दाखवा
मी राज्याचा मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मराठी सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. काही नतद्रष्ट याविरुद्ध कोर्टात गेले होते. पण आता मी सांगतोय इस राज्य में रहना है तो जय महाराष्ट्र बोलना होगा.. आम्ही येथे हिंदी भाषेची सक्ती कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. मी फडणवीसांना सांगतो, तुमचे जे कुणी जोशी की माशी घाटकोपरमध्ये बोलले होते आता त्या घाटकोपरमध्ये मराठी सक्ती करुन दाखवा. घाटकोपरमध्ये प्रत्येक माणूस मराठी बोलला पाहिजे असे करुन दाखवा असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले.
Uddhav Thackeray राज ठाकरेंच्या टाळीवर उद्धव ठाकरेंची प्रतिटाळी
एका मुलाखतीत मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव दिला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले होते. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी एकच अट आहे माझ्यासोबत येण्यात हित की भाजपसोबत जाण्यात हित हे ठरवा असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.