बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्री कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अनेक सिनेमामध्ये दमदार काम करून बॉलीवूडवर राज्य केले. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून अमिषा पटेल (Amisha Patel) आहे. अमिषाने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे. त्या फोटोंमुळे सध्या ती चर्चेत आली आहे. १८ आणि १९ एप्रिल २०२५ रोजी अमीषा पटेल यांनी इंस्टाग्रामवर दुबई येथील काही फोटो शेअर केले, ज्यात ती हिरव्या रंगाच्या स्विमसूटमध्ये दिसत आहेत. या फोटोंमध्ये तिचे पेट थोडे उभरलेले दिसत असल्याने चाहत्यांनी आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ती गर्भवती असल्याचा अंदाज बांधला. काहींनी याला “बेबी बम्प” म्हणून संबोधले. चाहते याबाबत विचारत आहेत की हे खरे आहे की नाही. काही वापरकर्त्यांनी कमेंट्समध्ये विचारले, “प्रेग्नेंट आहे की माझी गैरसमजूत आहे?” तर काहींनी याला फोटोमधील कोन किंवा कपड्यांचा परिणाम असल्याचे म्हटले.
अमीषा पटेलने कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. तिने या चर्चांना प्रत्युत्तर दिलेले नाही किंवा याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही. याआधीही अमीषा यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक अफवा पसरल्या आहेत. २०२४ मध्ये त्यांचे बिझनेसमन निर्वान बिर्ला यांच्यासोबतच्या फोटोमुळे डेटिंगच्या अफवा पसरल्या होत्या. अमीषाने यावर स्पष्ट केले की निर्वान हा फक्त मित्र आहे. जानेवारी २०२५ मध्ये त्यांचे पाकिस्तानी अभिनेता इमरान अब्बास यांच्यासोबत लग्नाच्या अफवा पसरल्या होत्या, ज्याला अमीषाने खोडून काढले आणि म्हटले की ते फक्त चांगले मित्र आहेत. अमीषा अनेकदा सिंगल स्टेटसबद्दल बोलले आहे. २०२४ मध्ये एका मुलाखतीमध्ये मजेशीरपणे सांगितले होते की ती तिच्या मनात हॉलीवूड अभिनेता टॉम क्रूज यांच्याशी “विवाहित” आहेत. यामुळे त्यांच्या लग्नाविषयी किंवा गर्भधारणेविषयीच्या अफवा अधिकच गुंतागुंतीच्या ठरताना दिसतात. कहो ना… प्यार है अमीषाने हृतिक रोशनसोबत या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि त्यांना रातोरात स्टार बनवली. आमिषाने गदर,भूल भुलैया,रेस २,गदर २ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.