12.5 C
New York

Sanjay Raut : मोदी, शहांना इंग्रजी येत नसल्याने हिंदीची सक्ती, राऊतांची टीका

Published:

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार आता पहिलीपासून इंग्रजीसह हिंदी भाषेचीही सक्ती करण्यात आली आहे. मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध करत एक पोस्ट करत निशाणा साधला. त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीदेखील सरकारच्या या निर्णयावर टीका केली. “हिंदी ही संवादात्मक भाषा असून त्याची सक्ती नको. अजूनही मराठी भाषा आपल्या महाराष्ट्रात सक्तीची झालेली नाही. त्यामुळे आधी मुख्यमंत्र्यांनी तिकडे लक्ष द्यावे,” असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. (Sanjay Raut Shivsena UBT on Hindi Language in maharashtra)

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना इंग्रजी येत नाही. त्यामुळे हिंदीची सक्ती करण्यात आली आहे. आधी इंटरनॅशनल शाळांमध्ये मराठी सत्तेची करा, त्याची हिंमत आहे का?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. “हिंदी आमच्यावर लादू नका. मुंबईला हिंदी शिकवण्याची किंवा हिंदी लादण्याची गरजच नाही. ज्या शहरात जगातला उत्कृष्ट हिंदी सिनेमा तयार होतो. तेथे हिंदी सक्ती करण्याची गरज नाही.” असे ते म्हणाले. अजूनही राज्यात अनेक ठिकाणी मराठी भाषा सक्तीची झाली नसल्याचे संजय राऊत यांनी यावेळी नमूद केले. मुख्यमंत्र्यांनी आधी माय मराठीकडे लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. “महाराष्ट्राच्या निर्मितीत भाजपचे कोणताही योगदान नाही. त्यामुळे आमच्यावर हिंदी लादू नका, सक्ती करू नका. हिंदी ही देशातील संवादात्मक भाषा आहे. तिला आमचा विरोध नाही.” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Sanjay Raut राज ठाकरेंवर टीका

“हिंदी भाषा सक्तीविषयी मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मोठे ट्विट केले होते. एवढ्या कमी वेळात ते कसे केले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्या ट्विटची स्क्रिप्ट ही सागर बंगल्यावर लिहिली गेली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img