21.3 C
New York

Papaya Leaf : पपईच्या पानांचे अजब फायदे जाणून घ्या

Published:

लहानमुलंपासून ते मोठ्या माणसांपर्यंत फळे ही सर्वानाच आवडतात. दररोजच्या जीवनात ब्रेकफास्टमध्ये फळांचा समावेश करत असतो. फळांचे सेवन केल्याने आरोग्याला मोठ्या प्रमाणात फायदे होतात. काही अशी फळे आहेत त्या फळाबरोबर त्या पानांचा देखील उपयोग औषधी वापरासाठी केला जातो. पपई (Papaya Leaf) हे एक असे फळ आहे. त्या फळाबरोबर त्या झाडांच्या पानांचा देखील उपयोग केला जातो. पपईमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी आणि अँटीऑक्सिडंट्स असते त्यामुळे त्वचेसाठी आणि केसांसाठी चांगले ठरतात. पपईमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने वजन कमी होण्यास मदत होते. याहून अधिक पपईचा उपयोग केला जातो. हे सार्वजहले पपईचे उपयोग पण पपईंच्या पानाचा काय उपयोग होते हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊयात.

पपईच्या पानांचा उपयोग औषधी आणि आरोग्यदायी गुणांमुळे विविध प्रकारे केला जातो. पपईच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि शरीराला संसर्गापासून वाचवतात. डेंग्यू तापामध्ये प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी प्रभावी मानला जातो. यासाठी पानांचा रस काढून २ – ३ चमचे दिवसातून दोनदा घेतात. पानांमध्ये पॅपेन आणि कायमोपॅपेन नावाची एन्झाइम्स असतात, जी पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर करते. पानांचा काढा किंवा रस पचनासाठी उपयुक्त आहे. पानांचा रस किंवा लेप त्वचेवरील मुरुम, काळे डाग आणि जखमांवर लावल्यास फायदा होतो. यामुळे त्वचा स्वच्छ आणि निरोगी राहते. रस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होऊ शकतो. पपईच्या पानांमध्ये दाहक-विरोधी गुण असतात, जे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करतात. पपईच्या पानांचा रस जास्त प्रमाणात घेऊ नये, कारण यामुळे पोटदुखी किंवा मळमळ होऊ शकते. गर्भवती महिलांनी आणि ऍलर्जी असणाऱ्यांनी वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ताजी आणि स्वच्छ पाने वापरावीत. पानांचा लेप तयार करून त्वचेवर किंवा जखमांवर लावा. पपईची पाने आयुर्वेदात आणि पारंपरिक औषधांमध्ये खूप महत्त्वाची मानली जातात, परंतु वापरापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे उत्तम.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img