22.9 C
New York

Crime News : कौटुंबिक वादातून पत्नीचा निघृण खून;पतीला ठोकल्या बेड्या

Published:

ओतूर,प्रतिनिधी:दि.१७ एप्रिल ( रमेश तांबे )

जुन्नर तालुक्यातील धंगाळधरे दरावस्ती (Crime News) येथे महिनाभरापूर्वी, कौटुंबिक वादातून पत्नीचा निघृण खून करून,जंगलात फरार झालेल्या आरोपी पतीस स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी बेड्या ठोकल्या असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर व सहाय्यक फौजदार दीपक साबळे यांनी दिली.

राजश्री अवरिंद विरनक रा.मुलुंड गोरेगाव पश्चिम मुंबई यांनी याबाबत जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अलका शंकर बांबळे वय ३५ वर्ष,रा दरावस्ती घंगाळदरे,ता.जुन्नर,जि.पुणे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

आरोपी शंकर बारकु बांबळे वय ३८ वर्ष,रा.दरावस्ती घंगाळदरे,ता.जुन्नर,जि.पुणे याला पोलीसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर म्हणाले की,दि.२१ मार्च २०२५ रोजी शंकर बांबळे याचे त्याची पत्नी अलका शंकर बांबळे हिच्या सोबत कौटुंबिक वादातून भांडण झाले.सदर भांडणामध्ये शंकर बांबळे याला राग अनावर झाल्याने त्याने त्याची पत्नी अलका बांबळे हिच्यावर धारधार कोयत्याने वार करत, तिचा खून केला.तसेच खून झाल्यानंतर शंकर बांबळे हा दुर्गादेवी, आंबे हातवीज, आहुपे घाटमाथा जंगलामध्ये पळून गेला.खून झाल्यापासून सदर आरोपी हा जंगलाचा आधार घेत पोलिसांना चकवा देत होता.सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखे मार्फत तपास करत असताना, गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार दीपक साबळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मळाली की,आरोपी शंकर बांबळे हा जुन्नर तालुक्यातील आहुपे जंगल घाट परिसरात लपून बसला आहे.मिळालेल्या माहिती नुसार गुन्हे शाखेच्या पथकाने आहुपे जंगल परिसरात आरोपीचा शोध घेऊन दि.१७ रोजी गुरूवारी पहाटे त्याला शिताफीने ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक फौजदार

दीपक साबळे,पोलीस हवालदार राजु मोमीन,संदीप वारे,अक्षय नवले जुन्नर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप मोरे,पोलीस शिपाई विजय जंगम यांनी केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img