उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा काल नाशिकमध्ये (Nashik) निर्धार मेळावा पार पडला. (Maharashtra Politics) यावेळी उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकांसाठी कोणता फॉर्म्युला असेल, ते सांगितलं आहे. विधानसभेच्या पराभवानंतर आता ठाकरेसेने (Uddhav Thackeray) आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी भाजपचा (BJP) संघटन फॉर्म्युला अवलंबणार असल्याचे संकेत खुद्द उद्धव ठाकरे यांनीच दिले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा काल नाशिकमध्ये निर्धार मेळावा पार (Maharashtra Politics) पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. भाजपवर टीका करत त्यांनी त्यांच्या बूथमॅनेजमेंटचं देखील कौतुक केलंय. याची शिवसेनेमध्ये (Shivsena) अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. आगामी निवडणुकीच्या तयारीसंबंधी विनायक राऊत यांनी बुथ मॅनेजमेंटचं मार्गदर्नशन केलंय.
भाजप महाराष्ट्र बुथ समिती गठनचा तपशील असल्याचं देखील ठाकरेंनी म्हटलंय. एक बूथ अध्यक्ष त्याच्यापुढे व्यक्तीचं नाव अन् मोबाईल क्रमांक, त्यानंतर बुथ सरचिटणीस त्याच्यापुढे पूर्ण नाव आणि मोबाईल क्रमांक, मग सदस्य अन् लाभार्थी प्रमुख, त्यांचेही नाव अन् मोबाईल क्रमांक आहे. पुढे दहा सदस्यांची नावे आणि मोबाईल क्रमांक, अशी भाजपची तयारी आहे. अशीच तयारी आपण देखील केली पाहिजे, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केल्या आहेत.
12 सदस्यांमध्ये किमान 3 महिला प्रतिनिधी, किमान एक एससी आणि एसटी प्रतिनिधी ही भाजपची मांडणी आहे. ईव्हीएम घोटाळा, योजनांचं गारूड नक्कीच आहे. परंतु बुथ मॅनेजमेंटचं महत्त्व देखील आहे, असं यावेळी ठाकरेंनी कार्यकर्त्यांसमोर अधोरेखित केलंय. आपल्या बुथ प्रमुख आणि पोलिंग एजंट यांना देखील असंच ट्रेनिंग दिलं पाहिजे. बुथ प्रमुख मतदार यादीतील प्रत्येकाला नावानिशी अन् चेहऱ्यासकट ओळखणारा पाहिजे. पोलिंग एजंटला कळलं पाहिजे की, मतदानाला आलेला माणूस मतदानाच्या यादीतला आहे की नाही.
विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची निराशाजनक कामगिरी होती. केवळ 20 आमदार निवडून आणण्यात ठाकरे सेनेला यश आलं होतं. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरेंनी रणनिती आखायला सुरूवात केलीय. आता ठाकरेंना यात किती यश मिळतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.