मुंबई आणि नाशिक (Mumbai Nashik Local Train) दरम्यान दररोज हजारो नागरिक प्रवास करत असतात. विशेषतः नोकरदार वर्गासाठी ही वाट खूप महत्त्वाची आहे. आता या मार्गावरून नाशिक ते मुंबई लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण कसारा घाटातील मोठी अडचण दूर झाली असून नव्या रेल्वे मार्गाला अंतिम मंजुरी मिळणार आहे. मनमाड ते कसारा (Manmad Kasara) दरम्यान १४० किलोमीटरचा नवीन रेल्वे मार्ग मंजूर झाला आहे. या मार्गावर दोन मोठे बोगदे आणि समांतर रेल्वे ट्रॅक असणार आहे. त्यामुळे प्रवास जलद आणि सुरक्षित होईल. या निर्णयामुळे मुंबई-नाशिक दरम्यान लोकल सेवा सुरू होण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.
Mumbai Nashik Local Train चार नवीन स्थानकांची योजना
मध्य रेल्वेने या नव्या मार्गासाठी प्राथमिक आराखडा तयार केला आहे. १४० किमी लांबीच्या या मार्गावर चार नवीन स्थानके उभारण्यात येणार आहेत – न्यू नाशिकरोड, न्यू पाडळी, वैतरणानगर आणि चिंचलखैरे. या स्थानकांमुळे स्थानिक प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहेत. या नव्या मार्गावर एकूण १२ बोगदे असणार असून त्यामध्ये मोठ्या आकाराच्या बोगद्यांचा समावेश आहे. यामुळे घाट क्षेत्रातील चढ-उतार कमी होऊन प्रवास अधिक आरामदायी आणि वेळ वाचवणारा होणार आहे. रेल्वेचे इंधनसुद्धा वाचणार आहे, जे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल.
या नव्या रेल्वे मार्गासाठी सुमारे ४,००० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे मुंबई व नाशिकमधील दळणवळणात (Mumbai Nashik Local Train) क्रांतिकारी बदल होणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. विशेषतः नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच या प्रकल्पाच्या कामांना सुरुवात होणार आहे. मुंबई-नाशिक दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे.