21.3 C
New York

Arbaaz SShura : अरबाज आणि शूरा लवकरच होणार आई बाबा?

Published:

बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्री कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या बॉलीवूड अभिनेता अरबाज आणि शूरा (Arbaaz SShura0 हे दोघे लवकरच आई बाबा होणार असल्याच्या चर्च्या रंगल्या आहेत. ५५ व्या वर्षी अरबाजने सेलेब्रिटी मेकअप आर्टिस्ट शूरासोबत लग्न केले. त्या आधी त्यांनी अभिनेत्री मलायका अरोरासोबत लग्न केले होते आणि त्या दोघांना एक मुलगा आहे. अरबाजचा पहिला मुलगा आराहान हा २३ वर्षांचा आहे. त्यानंतर अरबाज आणि मलायका यांनी २७ वर्षाच्या सुखी संसारनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

अरबाज आणि शूरा यांना मुंबईतील एका मॅटर्निटी क्लिनिकबाहेर पाहिले गेले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शूरा गरोदर असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. ३१ मार्च २०२५ रोजी सलमान खान यांनी आयोजित केलेल्या ईद पार्टीत अरबाज आणि शूरा यांची उपस्थिती आणि त्यांचा आनंदी मूड यामुळे या अफवांना बळ मिळाले. अनेकदा हे जोडपे एकत्र दिसते, जसे की ईद पार्टी, चित्रपट स्क्रिनिंग किंवा विमानतळावर. त्यांची जवळीक चाहत्यांना आवडते. अरबाज किंवा शूरा यांनी गरोदरपणाच्या बातम्यांवर कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. व्हायरल व्हिडीओ आणि सोशल मीडिया चर्चांमुळे या अफवा पसरल्या, परंतु पुरावा नाही.

एका मुलखाती दरम्यान अरबाजला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने सांगितले “मी खूप खुश आहे. पत्नीला भेटल्यापासून मी खूप शांत झालोय आणि शूराला डेट करत असताना अनेक गोष्टी बदल्या आहेत आणि हा बदल सकारात्मकच होता.” शूराला पहिलीपासून आणि बोलताना मी स्वतः आत्मविश्वासू झालोय, असंही अरबाज या मुलाखतीमध्ये सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img