17.4 C
New York

Aaditya Thackeray : गेल्या 100 दिवसात महायुतीने महाराष्ट्राला दिलंय तरी काय? आदित्य ठाकरेंचा सवाल

Published:

“महाराष्ट्रात 100 दिवसांमध्ये महिलांसाठी एकतरी चांगली योजना आणली का? गेल्या 100 दिवसांमध्ये शेतकऱ्यांसाठी एकतरी चांगली योजना आणली? तसेच या 100 दिवसांमध्ये तरुण-तरुणींसाठी काय केले?” असे अनेक सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केले. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे शिबीर सुरू असून यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांनी भाजपसह महायुतीवर निशाणा साधला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारला 100 हून अधिक दिवस झाले असले तरीही महाराष्ट्रामध्ये काय चालेल आहे? असा सवाल त्यांनी विचारला. यावेळी त्यांनी वाढती गुन्हेगारी आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केले. (Aaditya Thackeray Shivsena UBT criticized Mahayuti in Nashik party shibir)

नाशिकमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिबिरात आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, “मी संजय राऊत यांना फोन केला होता. यावेळी त्यांना विचारले की संजय काका उद्या काय बोलायचे आहे? मला विषय काय दिला आहे? तुम्हाला त्यांची स्टाईल माहिती आहे, ते पटकन काहीतरी बोलून जातात. त्यांनी मला सांगितलं महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे यावर बोल.” असा किस्सा सांगत त्यांनी माहिती दिली. “या सरकारला 100 दिवस उलटून गेले आहेत. पहिले 100 दिवस हनिमून पिरेड मानला जातो. या काळात मुख्यमंत्री जे काही करतात, त्याचे कौतुक साधारणपणे केले जाते. पहिल्या 100 दिवसांत एकही चांगली योजना कोणासाठीही आणली नाही,” असे म्हणत त्यांनी निशाणा साधला.

“देवेंद्र फडणवीस बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होते, आमचे सरकार येणार, सरकार आल्यानंतर हे करू वगैरे काय काय सांगत होते ते. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, सातबारा कोरा करणार इत्यादी म्हणाले होते. यावेळी शेतकऱ्यांची वीजमाफी सांगितली होती. फडणवीसांचे सरकार बसले, त्यांचे 136 आमदार निवडून आलेत. हे फडणवीसांचंच सरकार आहे. एकनाथ शिंदे तिथे चिकटण्यासाठी चिकटले आहेत. कारण बाहेर पडले तर तुरुंगात जातील. आता अमरावतीहून थेट गावी जाणार आहेत. कारण नाराजीचे नाट्य सुरू झाले आहे. आता पुढचं मी काही बोलत नाही” असे म्हणत आदित्य ठाकरेंनी टोलाही लगावला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img