10.7 C
New York

Indian Railways : आता ‘झूकझूक’ करत धावणाऱ्या रेल्वेत काढता येणार पैसे; महाराष्ट्रातून शुभारंभ

Published:

अनेकदा आपण दूरच्या प्रवासासाठी रेल्वेने निघालेलो असतो. पैसे असतातच. पण तरीही मनात विचार डोकावतो की जर रेल्वेतच एटीएम असतं तर. कारण भारतातील रेल्वेत (Indian Railways) एटीएम मशीन नसतात. त्यामुळे प्रवाशांना जर रेल्वे प्रवासादरम्यान अचानक पैशांची गरज भासली तर मोठी पंचाईत होते. पण आता काळजी करू नका. प्रवाशांची ही अडचण मिटली आहे. रेल्वे प्रवाशांचा सुविधेचा विचार करुन रेल्वेत एटीएम सेवा सुरू करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे.

Indian Railways रेल्वेत अवतरणार एटीएम, मिळतील पैसे

रेल्वे प्रवाशांचा हिताचा विचार करून रेल्वेत एटीएम सेंटर सुरू करण्याची अनोखी योजना भारतीय रेल्वेने आखली आहे. नांदेड ते मुंबई दरम्यान चालणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम मशीन बसवण्यात आले आहे. रोख पैशांच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्या लोकांना याचा फायदा होणार आहे. रेल्वे प्रवासा दरम्यान ऑनलाइन पेमेंटमध्ये बऱ्याचदा अडचणी येतात. त्यामुळे अशा प्रवाशांनाही या सुविधेचा फायदा होणार आहे. रेल्वेत असणारे एटीएम प्रवाशांना रेल्वे प्रवासा दरम्यान पैसे काढण्याची सुविधा देणार आहे.

Indian Railways रेल्वेत एटीएम ट्रायल सुरू

चालत्या रेल्वेत एटीएम योग्य पद्धतीने काम करत आहे की नाही याची तपासणी रेल्वे अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. नेटवर्क कनेक्टिविटी, सिक्योरिटी, प्रायव्हसी, प्रवाशांची सुविधा आणि अन्य आवश्यक गोष्टींची काळजी घेतली जात आहे. जर हा ट्रायल यशस्वी झाला तर पुढील काळात अन्य रेल्वेतही एटीएम मशीन बसवल्या जाऊ शकतात.

जे लोक लांब पल्ल्याचा प्रवास रेल्वेने करतात त्यांच्यासाठी ही सुविधा जास्त फायदेशीर ठरणार आहे. रेल्वेत पैसे चोरीच्या घटना नेहमीच घडत असतात त्यामुळे लोक रेल्वेत रोख पैसे कमीच बाळगतात. व्यवहार ऑनलाइन करतात. पंरतु, आता एटीएममुळे प्रवासात रोख पैशांचे टेन्शन राहणार नाही. जेव्हा वाटेल तेव्हा आणि तुम्हाला गरज वाटेल तितके पैसे तुम्ही एटीएममधून काढू शकता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img