12.5 C
New York

Google : भारतीय कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याच्या मार्गावर? गुगल मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Published:

गुगल कर्मचाऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. गुगल पुन्हा एकदा कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहे. नुकतंच कंपनीने जागतिक पातळीवर शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. (Google) आता नवीन फेरीत भारतातील जाहिरात, विक्री आणि मार्केटिंग विभागातील कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार असल्याचं बिझनेस स्टँडर्ड च्या वृत्तात म्हटलं आहे. ही कपात पुढील आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.

हैदराबाद आणि बेंगळुरु कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना तात्काळ कपात न करता, उत्पन्न वाढवणाऱ्या प्रकल्पांमध्ये पुनर्स्थित करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, गुगलकडून या संभाव्य कपातीची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. नुकतंच गुगलने कंपनीच्या प्लॅटफॉर्म आणि उपकरण विभागातील कर्मचाऱ्यांना कमी केलं होतं. यामध्ये Android सॉफ्टवेअर, Pixel फोन आणि Chrome ब्राउझरवर काम करणाऱ्या टीम्सचा समावेश होता.

कंपनीच्या प्रवक्त्यानुसार, अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत. यावर्षीच्या सुरुवातीस कंपनीने एक voluntary exit program देखील सुरू केला होता. याबाबत गुगलच्या प्रवक्त्याने सांगितले की, गेल्या वर्षी पासून आम्ही आमच्या कामात अधिक लवचिकता आणण्याचा आणि कार्यपद्धती सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत.

याच प्रोग्रामसाठी काही नोकऱ्या कमी करण्यात आल्या आहेत, आणि जानेवारी महिन्यात आमच्या exit प्रोग्रामचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, Layoffs.fyi या टेक उद्योगातील कपातींचा मागोवा घेणाऱ्या प्लॅटफॉर्मनुसार, ‘2025’मध्ये आतापर्यंत 93 कंपन्यांमधून 23,500हून अधिक टेक कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img