नाशिकच्या (Nashik) काठे गल्ली परिसरातील अनधिकृत सातपीर दर्गा 15 एप्रिल रोजी रात्री हटवण्यात आला आहे. ही कारवाई (Satpeer Dargah Violence) मुस्लिम धर्मगुरू आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संयुक्तपणे करण्यात आली आहे. परंतु त्याआधी या परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला होता. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण (Nashik Crime) झाली होती. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराचा वापर केला, काही जणांना यावेळी ताब्यात देखील घेतलं.
गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकच्या कोठे गल्ली परिसरामधील अनधिकृत दर्गा हटवण्याची मागणी केली जात होती. काही हिंदुत्ववादी संघटनांनी मागील महिन्यातच आंदोलन केलं होतं. या संदर्भात वक्फ बोर्ड आणि उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली (Nashik News) होती. या जागेबाबत दर्गा प्रशासनाला कोणतेही पुरावे सादर करता आले नसल्यामुळे उच्च न्यायालयाने दर्गा अनधिकृत ठरवला. तर दर्गा प्रशासनाला पंधरा दिवसांपूर्वीच अतिक्रमक काढण्याची नोटीस बजावण्यात आलीय.
परंतु नोटीस बजावून देखील अतिक्रमण काढले नाही, त्यामुळे प्रशासनाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. यावेळी परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झाला. जमावाने अचानक (Nashik Violence) पोलिसांवर तुफान दगडफेक केली. रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या दगडफेकीत अनेक पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. नाशिकचे अनधिकृत दर्गा प्रकरणी मध्यरात्री जमावाने पोलिसांवर दगडफेक केली होती. तर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराचा वापर केला. सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
आतापर्यंत याप्रकरणी 15 जणांना अटक करण्यात आलीय. 31 पोलिसांना किरकोळ दुखापत झालीय. तर जमावातील संशयित हल्लेखोरांच्या 57 दुचाकी पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती किरण कुमार चव्हाण यांनी दिली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणून पहाटे साडेपाच वाजेच्या सुमाऱ्यास दर्ग्याच्या तोडकामाला प्रारंभ झालाय. 90 टक्के काम पूर्ण झालंय. महापालिकेकडून पाडण्यात आलेल्या बांधकामाचा राडारोडा वेगाने हटवण्यात आलाय. याठिकाणी तणावपूर्ण शांतता असून यामार्गावरील वाहतूक वळविण्यात आल्याची माहिती मिळतेय.