साई पल्लवीच्या ‘दिया’ Diya हा चित्रपट तमिळ आणि तेलुगु भाषेत, कन्नडमध्ये ‘कनम’ नावाने रिलीज झाला होता. २०१८ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचे दिग्दर्शक ए. एल. विजय यांनी केले.साई पल्लवी (Sai Pallavi) (थुलसी आणि दिया यांच्या मुख्य भूमिकेत आहे त्याचबरोबर आर. जे. बालन, नाझरिया नझीम, प्रिया भवानी शंकर हे देखील मुख्य भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट रोमँटिक थ्रिलर ड्रामा आहे.
‘दिया’ हा चित्रपट एक भावनिक आणि थरारक कथानकावर आधारित आहे. यात साई पल्लवी थुलसी नावाच्या तरुणीची भूमिका साकारते, जी तिच्या आयुष्यातील काही दुखद घटनांमुळे गर्भपाताचा निर्णय घेते. यानंतर तिच्या आयुष्यात घडणाऱ्या काही अलौकिक आणि भावनिक घटनांभोवती कथा फिरते. चित्रपटात प्रेम, नुकसान आणि पुनर्जन्म यासारख्या थीम्स हाताळल्या गेल्या आहेत.
तिचा ‘थंडेल’ हा तेलुगु भाषेत चित्रपट आहे. ज्यामध्ये ती नागा चैतन्यासोबत दिसली, याने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. याशिवाय, ती नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात सीतेची भूमिका साकारणार आहे.
साई पल्लवीच्या अभिनयाची प्रशंसा केली. हा चित्रपट तमिळ आणि तेलुगु प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय ठरला होता, आणि मराठी प्रेक्षकांनाही तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर आवडला.
‘दिया’ हा चित्रपट काही ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे, जसे की Amazon Prime Video किंवा Sun NXT पाहत येत होता पण आता हा चित्रपट Zee 5 आणि युट्यूब वर देखील पाहता येणार आहे.