23.4 C
New York

Ladki Bahin Yojana : महिलांना 500 रुपये मिळणार ही अफवा; राज्यमंत्र्यांनी 2100 रुपयांबाबतही दिली माहिती

Published:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana)विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरली होती. या योजनेतून निवडणुकीपूर्वी अडीच कोटींहून अधिक महिलांना दरमहा 1500 रुपये हप्ता मिळाला. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकराने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही. अशातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र 8 लाख महिलांना 500 रुपयेच मिळणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे महिलांमध्ये नाराजीचे चित्र आहे. मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना 500 रुपये मिळणार ही अफवा असल्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी म्हटले आहे. तसेच लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपर्यंत मिळणार? याबाबतही त्यांनी माहिती दिली आहे. (Ashish Jaiswal informed that there is a rumor that eligible women under the Ladki Bahin scheme will get Rs 500)

विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना महायुती सरकारकडून 1500 देण्यात आल्यावर विरोधक सातत्याने आरोप करताना दिसत आहेत. सध्या विरोधक असा आरोप करत आहे की, आर्थिक सक्षम असलेल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत त्यांना मिळालेले लाडक्या बहिणींचे पैसेही त्यांच्याकडून वसूल करण्यात येत आहेत. यासंदर्भात राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, कोणत्याही महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही किंवा वसुली केलेली नाही. विरोधकांकडून भ्रम पसरवला जात आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

आशिष जयस्वाल यांना नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 8 लाख महिलांना 500 रुपये मिळण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, ज्या दिवशी शासन निर्णयात सुधारणा केली जाईल, तेव्हा ही बाब वेबसाईटवर जाहीर केली जाईल. तसेच मूळ जीआरमध्ये ज्या गोष्टी नमूद होत्या, त्या बाबी अनुसरून सर्व पात्र महिलांना या योजनेतील पैसे मिळतील. याशिवाय ही योजना यापुढेही सुरू राहील, असा विश्वास जयस्वाल यांनी व्यक्त केला.

Ladki Bahin Yojana पात्र महिलांना 2100 रुपये कधी मिळणार?

लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना 2100 रुपये कधी मिळणार? असा प्रश्नही आशिष जयस्वाल यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारच्या महसुलात वाढ झाल्यावर त्याचं योग्य नियोजन करण्याकरता विविध विभागांना त्या निधीचं वितरण केलं जातं. त्यामुळे ज्या दिवशी महसूल वाढ होईल, तेव्हा सर्व नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजनातील पात्र लाभार्थ्यांना सरकार टप्प्याटप्प्याने दिलेल्या वचनांची पूर्तता करेल, असे आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img