13.7 C
New York

Randeep Hooda : रणदीप हुडाची स्पष्टोक्ती: कंगनाचे ट्वीट खटकलं, आलियाचा अभिनय दमदार होता….

Published:

रणदीप हुडा (Randeep Hooda) आणि आलिया भट्ट यांनी एकत्र काम केलेली प्रमुख चित्रपट म्हणजे हायवे. आलिया आणि रणदीप यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या मध्यम यशस्वी ठरला, परंतु त्याची कथा आणि अभिनय यामुळे तो दीर्घकाळ लक्षात राहिला. हायवेला ६०व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये ९ नामांकने मिळाली, ज्यात आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) पुरस्कार मिळाला.

शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये रणदीपने हजेरी लावली. रणदीपने २०१९ च्या एका ट्वीटचा उल्लेख केला, ज्यात त्याने कंगनाने आलिया भट्टच्या गली बॉय चित्रपटातील अभिनयाला “मध्यम” म्हटल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. रणदीपने स्पष्ट केले की, हे ट्वीट कंगनाला उद्देशून होते. त्याने म्हटले की, कंगना एक उत्तम अभिनेत्री आहे आणि तिच्याकडून अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही. रणदीपने पुढे सांगितले की, त्याचे आणि कंगनाचे व्यावसायिक संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत आणि त्यांनी एकत्र कामही केले आहे. मात्र, आलियासोबत हायवे चित्रपटात काम केल्यामुळे आणि तिच्या अभिनयाचे कौतुक असल्याने, कंगनाच्या टीकेचा त्याला राग आला. याशिवाय, कंगनाने या प्रकरणी अद्याप कोणतेही प्रत्यक्ष उत्तर दिलेले नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img