राज्यात सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) महत्वाची बातमी समोर आली आहे. दोन योजनेचा लाभ या योजनेतील अटीनुसार घेता येत नाही. त्यामुळे राज्यातील नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनाचा हप्ता आता कमी मिळणार आहे. या महिलांना नमो शेतकरी योजनेच्या रक्कमेनंतर शिल्लक राहणारी रक्कम मिळणार आहे. राज्यात आठ लाख महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याचे छननीनंतर स्पष्ट झाले.
Ladki Bahin Yojana का घेतला निर्णय
लाडकी बहीण योजनेचा हप्ता नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना कमी मिळणार आहे. 1500 रुपयांऐवजी या महिलांना 500 रुपये या महिन्यापासून मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेतील अटीनुसार एका सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही. नमो शेतकरी योजनेत महिलांना सहा हजार रुपये वर्षाला मिळतात. तसेच केंद्र शासनाकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये मिळतात. म्हणजेच या महिलांना शासकीय योजनेचे वर्षाला बारा हजार रुपये मिळत आहे. यामुळे या महिलांना आता वर्षाला राहिलेले सहा हजार रुपयेच लाडकी बहीण योजनेतून मिळणार आहे. म्हणजेच 500 रुपये नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मिळणार आहे.
राज्य सरकारने 2023 मध्ये केंद्राच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो महासन्मान निधी योजना सुरु केली. या योजनेतून शेतकऱ्यांना तीन समान टप्प्यात वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. केवळ दोन हजार रुपये म्हणजेच चार महिन्याला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. एप्रिल महिन्याचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर म्हणजे 30 एप्रिल रोजी मिळणार आहे. त्यावेळी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 मिळणार आहे. 9 हप्ते लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंतमहिलांच्या खात्यात जमा केले. मात्र एप्रिलचा 10 हप्ता मिळालेला नाही. तो 30 एप्रिल रोजी मिळणार आहे.