9.3 C
New York

Ashish Shelar : रायगडच्या पालकमंत्री पदाचा विषय कोणाच्या अखत्यारित? आशिष शेलार म्हणाले….

Published:

भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज रायगड दौऱ्यावर येत आहेत. अमित शाह हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनासाठी जाणार आहेत. अमित शाह यांचा आजचा रायगड दौरा आणि सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेह भोजन यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. राज्यात महायुतीच सरकार स्थापन होऊन आता चार महिने होत आले, तरी अजून रायगड जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेला नाही. अमित शाह आज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच दर्शन घेणार आहेत. अमित शाह यांच्या या रायगड भेटील पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल अशी राजकीय चर्चा सुरु आहेत.

रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सुनील तटकरे यांच्या इतकच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच वजन आहे. शिवसेनेच्या आमदारांचा तटकरे कुटुंबाकडे पालकमंत्रीपद देण्यास कडाडून विरोध आहे. या विषयात शिवसेना प्रचंड आक्रमक आहे. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती आमदार-मंत्री आहेत. शिवसेनेचे रायगडमधून भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी हे आमदार आहेत. भरत गोगावले हे सुद्धा मंत्री आहेत. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांची नाव आधीपासूनच चर्चेत आहे. पण तटकरे-शिवसेना वादामुळे पालकमंत्री पदावर तोडगा निघालेला नाही.

Ashish Shelar कोणाच्या अखत्यारितील विषय?

अमित शाह यांच्या रायगड भेटीत यावर मार्ग निघेल अशी अपेक्षा व्यक्त होतं आहे. राज्य सरकारमध्ये मंत्री असणारे आशिष शेलार आणि भाजप नेते प्रवीण दरेकर हे अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये आले आहेत. तिथे टीव्ही 9 मराठीशी बोलताना आशिष शेलार यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत वक्तव्य केलं. रायगडच पालकमंत्रीपद हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारितील विषय असल्याच शेलार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत अंतिम निर्णय फडणवीसांचाच असेल हे स्पष्ट आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img