गृहमंत्री अमित शाह आज रायगड दौऱ्यावर आहेत. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) महापुरूषांचा किंवा छत्रपतींचा अपमान करण्याऱ्यांना कारवाईचा इशारा दिला. तसेच जागतिक वारसा स्थळं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गड-किल्ले हे युनेस्कोकडेनॉमिनेट केलं आहे. अशी माहिती दिली.
Devendra Fadnavis काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
आज देशाचे गृहमंत्री अमित शाह हे राज्यात आले आहेत. त्यानिमित्ताने खासदार उदयन राजे भोसले यांनी एक मोठी मागणी केली आहे. त्यावर विचार करून आम्ही त्यांच्याशी चर्चा देखील केली आहे. त्या संदर्भात आम्ही योग्य कारवाई करू. आमचं तर मत आहे की, महापुरूषांचा किंवा छत्रपतींचा अपमान करण्याऱ्यांना टकमक टोकावरूनच लोटून दिलं पाहिजे. मात्र आपण लोकशाहीमध्ये असल्याने आपल्याला त्याच पद्धतीने कारवाई करू. तसेच छत्रपतींचा प्रमाण इतिहास राज्य सरकारच्या वतीने तयार करू. आम्ही न्यायालयात तसेच अरबी समुद्रातील छत्रपतींचं स्मारक लढून मोकळं करून घेऊ…
दिल्लीतील शिवरायांच्या राष्ट्रीय स्मारकाची तसेच त्यांनी गृहमंत्र्यांना आठवण करून दिली. तसेच यावेळी फडणवीसांनी महत्त्वाची माहिती दिली. ती म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गड-किल्ले हे युनेस्कोकडे जागतिक वारसा स्थळं म्हणून नॉमिनेट केलं आहे. त्यावर आता मी आणि आशिष शेलार हे यासाठी 18 ते 21 एप्रिल या कालावधीत फ्रान्समध्ये युनेस्कोच्या समोर आमचं प्रेझेंटेशन होणार आहे. मला विश्वास आहे. मोदींच्या पुढाकारने महाराजांच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळं म्हणून दर्जा मिळेल. अशी माहिती दिली आहे.