17.4 C
New York

Tahawwur Rana : कुठल्याही क्षणी तहव्वुर राणाला भारताच्या ताब्यात ,भारताच्या स्पेशल टीम्स अमेरिकेत

Published:

मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाला (Tahawwur Rana) आज कुठल्याही क्षणी भारताच्या ताब्यात सोपवलं जाऊ शकतं. राणाच्या प्रत्यर्पणासाठी भारताच्या वेगवेगळ्या एजन्सीच्या टीम सध्या अमेरिकेमध्ये आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तहव्वुर राणाच्या प्रत्यर्पणासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया सुरु आहेत. राणाला लवकरच भारताच्या ताब्यात सोपवलं जाण्याची शक्यता आहे.

तहव्वुर राणाला एक किंवा दोन दिवसात भारतात आणलं जाऊ शकतं. अमेरिकी कोर्टाच्या सल्ल्यानुसार तहव्वुर राणासाठी दिल्ली आणि मुंबईच्या तुरुंगात गोपनीय पद्धतीने सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतात आणल्यानंतर राणाला सुरुवातीचे काही आठवडे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) कोठडीत ठेवलं जाऊ शकतं. हे सगळं ऑपरेशन NSA अजित डोवाल, एनआयए आणि गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली होईल.

Tahawwur Rana त्याच्या बाजूने सर्व प्रयत्न केले

आपलं प्रत्यर्पण रोखण्यासाठी तहव्वुर राणाने अमेरिकी कोर्टात धाव घेतली होती. पण अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने तहव्वुर राणाचा अर्ज फेटाळून लावला. मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यात तहव्वुर राणाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारताकडे प्रत्यर्पण होऊ नये, यासाठी तहव्वुर राणाने त्याच्या बाजूने सर्व प्रयत्न केले.

Tahawwur Rana भारतात मी जास्त काळ जगू शकणार नाही

राणाने अमेरिकी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलेलं की, त्याच्या प्रत्यर्पणावर इमरजन्सी स्टे लावा. भारताकडे माझं प्रत्यर्पण झालं, तर मला त्रास दिला जाईल. भारतात मी जास्त काळ जगू शकणार नाही, असं तहव्वुर राणाने त्याच्या याचिकेत म्हटलं होतं.

Tahawwur Rana तहव्वूर राणा कोण?

पाकिस्तानी लष्करात डॉक्टर असलेला तहव्वूर राणा हा आयएसआय आणि लष्कर-ए-तय्यबाचा हस्तक आहे. तहव्वूर हा 11 ते 21 नोव्हेंबर 2008 या काळात भारतात होता. तसेच तो 20 आणि 21 नोव्हेंबरला मुंबईत होता. तहव्वूर राणा याने डेव्हिड कोलमन हेडली याला सहकार्य केल्याचा आरोप आहे. तहव्वूर राणा हा कॅनडाचा नागरीक आहे. तो पत्रकाराच्या हत्ये प्रकरणी अमेरिकेच्या कारागृहात आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img