भारतासह जगभरातील अनेक देशातील शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड झाल्याने आजचा दिवस शेअर मार्केटसाठी ‘ब्लॅक मंडे’ ठरला आहे. अशा प्रकारे शेअर मार्कटमध्ये (Share Market) भूकंप होण्यामागे डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेलं टॅरिफ वॉर असल्याचे बोलले जात असून, भारतीय शेअर बाजारात धडाधुडूम झाल्यानंतर ठाकरेंची तोफ असणाऱ्या संजय राऊतांनी (Sanjay Raut) भविष्यात ट्रम्प यांना फटकारलं गेल्यास आश्चर्य वाटणार नाही असे विधान केलं आहे. जशी अमेरिका विकली जाते आहे तसा हा देश मोदी आणि अमित शहा यांच्या लाडक्या उद्योगपतींना विकला जातोय अशी टीका राऊतांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Sanjay Raut On Share Market Fall Down)
Sanjay Raut तसं चित्र आता भारतात दिसतंय
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलोन मस्क याच्या दोस्ती वरून अमेरिकेची जनता सध्या रस्त्यावर उतरली आहे. त्याबद्दल तेथील जनतेचं अभिनंदन केले पाहिजे. लोकशाही काय असते आणि लोकशाही वाचवण्यासाठी जनता काय करू शकते हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जस दिसलं तसं आता अमेरिकेत दिसत आहे. अमेरिकेच्या 50 राज्याची जनता ट्रम्प आणि उद्योगपती मस्क म्हणजे तिकडले अडाणी यांच्याविरोधात रस्त्यावर उतरली असल्याचे राऊत म्हणाले. भारतामध्येसुद्धा अशा प्रकारचा स्पोट होण्याची शक्यता आहे असून, असे होण्यामागे उद्योगपतींच्या घशात घातली जाणारी देशातील जमीन हे असेल.
जशी अमेरिका विकली जाते आहे हा देश मोदी आणि अमित शहा यांच्या लाडक्या उद्योगपतींना विकला जातोय. वक्फचे विधेयक ही एक महत्त्वपूर्ण पायरी आहे. हे सर्व काही अदानींच्या घशात जात आहे हे स्पष्ट आहे.धारावीपासून वर्क बोर्डापर्यंत. एलोन मस्कला ज्या पद्धतीने अमेरिका विकली जातेय. जसा तिकडे एलोन मस्क तसा आपल्याकडे दोन ते चार उद्योगपती देश चालवतात. त्यामुळे या देशातसुद्धा गावागावांमध्ये रस्त्यावर उतरून क्रांतीचा झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही.
या देशात चार उद्योगपती आहेत ते देश चालवत आहेत हस्तक्षेप करत आहेत त्यांच्या सोयीने धोरण बदलली जात आहेत. कामगार कायदे बदलले जात आहेत. त्यामुळे उद्या ट्रम्पला व्हाईट हाऊसमध्ये घुसून फटकावलं तरी आश्चर्य वाटणार नाही असे म्हणत या देशात सुद्धा तेच घडणार असल्याचे सांगत नरेंद्र मोदी 2025 चा काळ पूर्ण करतील का? मला शंका वाटते हे मी वारंवार बोलत आहे. मोदी परदेशात फिरत आहेत त्यांना देशामध्ये काय कोसळले आहे काय पडले आहे याच्याशी काही घेणंं देणं नसून, ते वीस हजार कोटीच्या आलिशान विमानातून फिरत आहेत आणि परदेशात जाऊन परदेशी पंतप्रधानांना मिठ्या मारतायत आहेत आणि त्यांचे अंधभक्त बघा मोदींच्या परदेशात कसं स्वागत होतं हे बघून फुशारक्या मारत आहेत.