5.4 C
New York

Shivsena UBT : बँक अधिकाऱ्यांना चोपून काढा; ठाकरे गटाचे शेतकऱ्यांना आवाहन

Published:

देवेंद्र फडणवीस सरकारमधील एक-एक मंत्री म्हणजे नमुनाच म्हणावा (Shivsena UBT) लागेल. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन फडणवीस वगैरे मंडळींनी दिले होते. सरकार विराजमान होताच शेतकऱ्यांना फसवण्यात आले. कर्जमाफी शक्य नाही असे अर्थमंत्री अजित पवार यांनी तोंडावर सांगितले. राज्यातील 25 लाख शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास पडला आहे. तो सोडवण्याची इच्छाशक्ती सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. आमचे सरकार ब्रम्हदेवही पाच वर्षे पाडू शकत नाही, या मस्तवालपणातूनच ते 25 लाख शेतकऱ्यांभोवती कर्जाचा फास आवळण्याचा निर्घृणपणा करीत आहेत. तो ब्रम्हदेव काही करो ना करो, परंतु बळीराजालाच आता या मस्तवाल सत्ताधाऱ्यांविरोधात एल्गार पुकारावा लागेल. एकजुटीच्या वज्रमुठीचा तडाखा देऊन त्यांची मस्ती उतरवावी लागेल. आपल्या भोवती पडलेला फास सरकारच्या गळ्यात टाकून आवळावा लागेल! असे आवाहनच शिवसेना ठाकरे गटाने शेतकऱ्यांना केले आहे.

Shivsena UBT कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या इज्जतीचे धिंडवडे काढले

फडणवीस सरकारमधील अर्थमंत्री अजित पवार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनावरुन घुमजाव केले आहे. उलट कृषिमंत्री माणिक कोकाटे यांनी तर त्याही पलीकडे उडी मारत सांगितले की, कर्जाच्या पैशांची शेतकरी उधळपट्टी करतात. शेतकरी कर्ज घेतात आणि पाच-दहा वर्षे कर्जमाफीची वाट पाहतात. कर्जमाफी झाली की त्या पैशांतून साखरपुडे, लग्न वगैरे समारंभ करतात. राज्याच्या कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या इज्जतीचे धिंडवडे काढले. शेतकरी हवालदिल झाला असल्याचा आरोप शिवसेना ठाकेर गटाने दैनिक सामानाच्या अग्रलेखातून केला आहे.

Shivsena UBT फडणवीस सरकार हे क्रूर आणि अमानुष

शिवेसना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे की, मंत्र्यांच्या बंगल्यांवर गेल्या तीन महिन्यात पन्नास कोटींवर सरकारी पैशांची उधळपट्टी झाली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या काळात पीकविमा योजनेत शेकडो कोटींचा घोटाळा झाला. बोगस लोकांच्या नावावर कर्ज व लाभ दाखवून लूट केली. या लुटीच्या पैशांतून आधीच्या मंत्र्यांनी काय दिवे लावले? निवडणुकीआधी लाडक्या बहिणींची मते विकत घेण्यासाठी झालेल्या उधळपट्टीवर कोणी बोलेल काय? असा सवाल कर ठाकरे म्हणाले क, शेतकऱ्याने काही अपेक्षा ठेवली तर त्याला वेड्यात काढायचे हे फडणवीस सरकारचे धोरण दिसते. फडणवीस सरकार हे क्रूर आणि अमानुष आहे. शेतकऱ्यांच्या मानेभोवती कर्ज वसुलीसाठी बँकाचा फास आवळायला सुरुवात केली आहे. राज्यातील 25 लाख शेतकऱ्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 च्या कलम 101 नुसार कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठवणे अमानुष आहे. असेही ठाकरेंनी म्हटले आहे.

Shivsena UBT बँक अधिकाऱ्यांना चोपून काढा

शेतकरी संघटीत नाही व शेतकऱ्यांचे नेते फितूर झाले आहेत. कर्ज वसुलीसाठी येणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना चोपून काढू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला, पण चोपण्याची सुरुवात शेट्टी यांनी स्वतः करायला हवी, असे आवाहन ठाकरेंनी शेट्टींना केले आहे. कर्ज वसुलीची नोटीस आलेले 25 लाख शेतकरी एकजुटीने रस्त्यावर उतरले आणि फसवणूक करणारे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांच्या इस्टेटीवर चाल करुन गेले तर या सगळ्यांना देश सोडून पळून जावे लागेल, पण क्रांतीची ठिणगी टाकायची कोणी? असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाने शेतकरी नेत्यांना केले आले.

Shivsena UBT बँक अधिकाऱ्यांना चोपून काढा

शेतकरी संघटीत नाही व शेतकऱ्यांचे नेते फितूर झाले आहेत. कर्ज वसुलीसाठी येणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना चोपून काढू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला, पण चोपण्याची सुरुवात शेट्टी यांनी स्वतः करायला हवी, असे आवाहन ठाकरेंनी शेट्टींना केले आहे. कर्ज वसुलीची नोटीस आलेले 25 लाख शेतकरी एकजुटीने रस्त्यावर उतरले आणि फसवणूक करणारे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांच्या इस्टेटीवर चाल करुन गेले तर या सगळ्यांना देश सोडून पळून जावे लागेल, पण क्रांतीची ठिणगी टाकायची कोणी? असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाने शेतकरी नेत्यांना केले आले. शिवसेना ठाकरे गटाने म्हटले आहे की, राज्यातील 25 लाख शेतकऱ्यांच्या गळ्याभोती कर्जाचा फास पडला आहे. 25 लाख शेतकरी व त्यांचे कुटुंब असा दीड कोटी लोकांचा हा ‘गहन’ प्रश्न आहे. तो सोडवण्याची ना कुवत सध्याच्या सत्ताधाऱ्यांमध्ये आहे, ना तो सोडवण्याची इच्छाशक्ती त्यांच्याकडे आहे. असा टोलाही ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img