12.4 C
New York

Eknath Shinde : शिंदेंच्या ड्रिम प्रोजेक्टला ब्रेक! ठाण्याच्या राजकारणाचा दणका साताऱ्याला

Published:

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील (Satara) महत्वकांक्षी ‘मुनावळे आंतरराष्ट्रीय जल पर्यटन प्रकल्पाला’ स्थगिती देण्यात आलीय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (Eknath Shinde) असताना त्यांनी मुनावळे प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर 8 मार्च 2024 रोजी या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. ग्रामीण भागामध्ये पर्यटन व्यवसायाला चालना देण्यास राज्य सरकारकडून मुनावळेमध्ये हा प्रकल्प (Munavale International Water Tourism Project) विकसित करण्याचे काम सुरू होते.

Eknath Shinde प्रकल्पाचं काम थांबवण्याचे आदेश

परंतु शिंदेंच्या या ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक देण्यात आल्याचं कारण समोर आलंय. मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य यांनी नुकतेच हा प्रकल्प थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तब्बल 16 परवानग्या नसल्यामुळे मुनावळे आंतरराष्ट्रीय जल पर्यटन (Maharashtra Politics) प्रकल्पाचं काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

परंतु या स्थगितीमागे ठाण्याचं राजकारण असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. कारण ठाणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यातील संघर्ष काही कमी होत नाहीये, मंत्री असताना नाईकांनी शिंदेंना कधीच राजकारणात वरचढ ठरू दिलं नव्हतं. याचाच मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पुरेपुर बदला घेतला, ज्यामुळे त्यांच्यातील संघर्ष अजून तीव्र झाला असं सांगितलं जातंय. तर ठाण्यातील जनता दरबारावरून देखील त्यांच्यात चांगलीच जुंपल्याचं समोर आलं होतं.

Eknath Shinde इकोसिन्सिव्ह झोन

दरम्यान आता इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय जल पर्यटन प्रकल्पाला ब्रेक बसला आहे. तर 16 परवानग्या नसल्यामुळे या प्रकल्पाचं काम सुरू करता येणार नसल्याचे आदेश मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य यांनी दिलेत. हे ठिकाण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पर्यावरण आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी इकोसिन्सिव्ह झोन म्हणून जाहीर करण्यात आलंय.

Eknath Shinde 16 विभागांच्या परवानग्या

मुनावळे येथे कोणतेही पर्यटन प्रकल्प राबवत असताना वन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय भारत सरकार, केंद्रीय वन्यजीव मंडळ, राज्य वन्यजीव मंडळ, स्थानिक सल्लागार समिती सह्याद्री व्याघ्र राखीव, कोयना जलसंपदा विभाग, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, स्थानिक ग्रामपंचायत या प्राधिकरणांच्या 16 ना-हरकत परवानग्या मिळवणे गरजेचे आहे. असं असताना सद्य:स्थितीमध्ये कोणत्याही विभागाची परवानगी मिळाली नाही, असं उघड झालंय. त्यामुळे न हरकत प्रमाणपत्र गरजेचे होते. त्यामुळे वरील सर्व विभागांच्या परवानग्या प्राप्त झाल्याशिवाय पर्यटन प्रकल्पातील कामे सुरू करू नये, असे लेखी आदेश मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य यांनी दिलेत.

Eknath Shinde ठाण्याच्या राजकारणाचा दणका साताऱ्याला

कोयना धरणातील शिवसागर जलाशयात मुनावळे येथील जलपर्यटनाचा प्रकल्प गोड्या पाण्यातील देशातील पहिलाच जल पर्यटन प्रकल्प आहे. याचं उदघाट करताना एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पामुळं स्थानिकांना फायदा होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. यासाठी 45 कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आला होता. परंतु याच प्रोजेक्टला ब्रेक मिळाल्यानं ठाण्याच्या राजकारणाचा दणका साताऱ्याला बसलाय, अशी चर्चा राजकारणात सुरू आहे.Eknath Shinde ठाण्याच्या राजकारणाचा दणका साताऱ्याला

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img