ज्याची भीती होती तेच घडलंय. आशियाई शेअर बाजारातील तीव्र घसरणीचापरिणाम आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी भारतीय शेअर बाजारावरही दिसून आलाय. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक उघडताच कोसळले. प्री-ओपन मार्केटमध्येच, दोन्ही शेअर्समध्ये सुमारे 5 टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह व्यवहार होताना (Share Market Update) दिसले. यानंतर, जेव्हा बाजार उघडला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स (Sensex) 3000 पेक्षा जास्त अंकांच्या घसरणीसह उघडला, तर दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी (Nifty) देखील 1000 पेक्षा जास्त अंकांच्या घसरणीसह व्यवहार करू लागला. टाटा मोटर्सपासून रिलायन्सपर्यंत, सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारात मोठी घसरण झालीय.
अमेरिकेच्या परस्पर करामुळे जगभरातील शेअर बाजारात (Stock Market) गोंधळ आहे. याचा परिणाम भारतावरही झाला आहे. प्रत्येक क्षेत्राचा निफ्टी निर्देशांक लाल रंगात आहे. देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 50 टक्क्यांनी घसरले आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही विक्रीचा मोठा दबाव आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 19.39 लाख कोटी रुपयांनी घसरले आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 19.39 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.
अमेरिकन टॅरिफचा परिणाम केवळ भारतीय बाजारपेठेवरच नाही, तर जगभरातील शेअर बाजारांवरही दिसून येतो. सर्वत्र मोठी घसरण दिसून आली आहे. ऑस्ट्रेलिया, जपान आणि तैवानच्या बाजारपेठेतही मोठी घसरण दिसून आली आहे.
Share Market Update ट्रम्पच्या टॅरिफनंतर शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण
ऑस्ट्रेलियन शेअर बाजार 6.4 टक्क्यांनी घसरण
सिंगापूर एक्सचेंज मार्केट 7 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण
शांघाय कच्च्या तेलाच्या किमतीत टक्क्यांनी घसरण
हाँगकाँगच्या हँग सेंग निर्देशांक बाजारात 9.28 टक्क्यांनी घसरण
जपानचा शेअर बाजार जवळपास 20 टक्क्यांनी घसरण
तैवान शेअर बाजार 15 टक्क्यांनी घसरण
बीएसई सेन्सेक्स सध्या 3379.19 अंकांनी म्हणजेच 4.48% च्या मोठ्या घसरणीसह 72633.63 वर आहे आणि निफ्टी 501056.05 अंकांनी म्हणजेच 4.61% च्या घसरणीसह 21848.40 वर आहे. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 930.67 अंकांनी 1.22% ने घसरून 75364.69 वर बंद झाला, तर निफ्टी देखील 1.49% ने नी घसरून 22904.45 वर बंद झाला.