4.4 C
New York

Saudi Arabia Visa Ban : भारताला मोठा झटका!! सौदी अरेबियाने घातली व्हिसा बंदी

Published:

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मोठा झटका देणारी बातमी समोर येतेय. सौदी अरेबियाने भारत आणि पाकिस्तानसह १४ देशांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. सौदी परराष्ट्र मंत्रालयाने या १४ देशांसाठी व्हिसा बंदी (Saudi Arabia Visa Ban) घातली आहे… हि बंदी तात्पुरत्या स्वरूपाची असून जूनच्या मध्यापर्यंत सुरू राहील असं म्हंटल जातंय. सौदी अरेबिया सरकारची ही तात्पुरती बंदी व्यवसाय आणि कुटुंब व्हिसासह उमराह व्हिसावरही लागू होईल. त्यामुळे भारताला मोठा झटका बसला आहे.

Saudi Arabia Visa Ban सौदी अरेबियाने बंदी का घातली?

सौदी अरेबिया येथील मक्का आणि मदिना मध्ये हजसाठी येणाऱ्या यात्रेकरूंच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आणि नियमांचे पालन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सौदी परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे. सरकारने सर्व बाधित प्रवाशांना हे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारचा दंड टाळता येईल. यासोबतच, अधिकाऱ्यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की व्हिसा बंदी झुगारून जे लोक सौदी अरेबियात बेकायदेशीरपणे राहतात त्यांना पुढील पाच वर्षे देशात प्रवेश दिला जाणार नाही.

खरं तर यापूर्वी, बरेच लोक उमराह किंवा इतर कोणत्याही कारणासाठी मल्टिपल एंट्री व्हिसा घेऊन सौदी अरेबियात येत असत, परंतु हज च्या काळात तिथेच राहून परवानगीशिवाय हजमध्ये सहभागी होत असत. यामुळे गर्दी आणि सुरक्षेच्या समस्या निर्माण झाल्या. याशिवाय, दुसरी एक गोष्ट म्हणजे काही लोक व्यवसाय आणि कौटुंबिक व्हिसावर सौदी अरेबियात राहतात आणि बेकायदेशीरपणे काम करतात, ज्यामुळे सौदी अरेबियाची कामगार व्यवस्था विस्कळीत झाली… त्यामुळे काही ठराविक देशांना व्हिसा बंदी (Saudi Arabia Visa Ban) घालण्याचा निर्णय सौदी अरेबियाने घेतला आहे.

Saudi Arabia Visa Ban कोणकोणत्या देशांवर बंदी?

सौदी अरेबियाने भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इजिप्त, इंडोनेशिया, इराक, नायजेरिया, जॉर्डन, अल्जेरिया, सुदान, इथिओपिया, ट्युनिशिया आणि येमेन या १४ देशांवर तात्पुरत्या स्वरूपाची बंदी घातली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img