https://www.mumbaioutlook.com/wp-content/uploads/2024/04/cropped-author6.jpg

5.4 C
New York

Sanjay Raut : हाच एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट, संजय राऊतांचा हल्लाबोल

Published:

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ड्रीम प्रोजेक्टवर मोठं वक्तव्य केलंय. एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट एकच होता शिवसेना (Shiv Sena) फोडून मोदींच्या पायाशी ठेवणे, असं संजय राऊत यांनी आज माध्यमांसमोर बोलताना म्हटलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

एकनाथ शिंदे यांचा साताऱ्यातील ड्रीम प्रोजेक्ट थांबवण्यात आलाय. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचा एकच ड्रीम प्रोजेक्ट (Maharashtra Politics) होता. तो म्हणजे शिवसेना फोडून मोदींच्या पायाशी ठेवणे. युज अॅड थ्रोमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आहे. त्यांचे नाव कसे काढणार? बापाचा ‘ब’ काढणार का? असा देखील सवाल राऊत यांनी केलाय.

परंतु एकनाथ शिंदे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण झालेला नाही. शिवसेना आजही मजबूतीने उभी आहे, काही आमदार- खासदार गेले आहेत. परंतु शिवसेना मजबूत असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय.

तर भाजपच्या स्थापना दिवसावर बोलताना राऊत म्हणाले की, भाजपाची स्थापना आमच्या समोर झाली. मूळ शिवसेना भाजपाला सिनियर आहे. तेव्हा एका उदात्त हेतूने यांचा जन्म झाला होता. परंतु ज्यांनी पक्षाला जन्म घातला ते लालकृष्ण अडवाणी सारखे नेते तुरूंगात आहे. आताचं भाजप मूळ भाजप नसल्याची टीका राऊतांनी केलीय.

कुठलेही मुद्दे हिंदुत्वासोबत जोडून भाजप वातावरण खराब करत आहे. हिंदूंना मूर्ख समजता का तुम्ही? वक्फ बोर्डाची जमीन तुम्हाला हडप करायची आहे. मोठ्या उद्योगपतींना या जमिनी देण्यासाठी हे सुरू आहे. सार्वजनिक जमिनी उद्योगपतींना विकून झालेत, त्यामुळे आता वक्फ बोर्डाची संपत्ती दिसली. भविष्यात या जमिनी भाजप नेते आणि उद्योगपतींच्या घशात घालणार आहे. मी सत्य बोलतो म्हणून माझ्यावर टीका होतेय, असं देखील राऊतांनी म्हटलंय.

तर दीपक केसरकर यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी म्हटलं की, कोण दीपक केसरकर… ते मोदींशी भेट घडवणार का? केसरकर केव्हा हिंदुत्ववादी झाले, उद्धव ठाकरेंना मोदींसोबत भेट घेण्यासाठी केसरकर का लागतील? मोदींची भेट घेण्यासाठी केसरकर आम्हाला लागत असतील, तर आम्हाला राजकारण सोडावे लागेल, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img