संसदेत वक्फ सुधारणा विधेयक (Waqf Bill) मंजूर झालंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 5 एप्रिल रोजी या विधेयकावर स्वाक्षरी केली, त्यानंतर या विधेयकाने कायद्याचे रूप धारण केलंय. शिवसेना यूबीटी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वक्फ विधेयकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर निशाणा साधलाय. देश विकून झाल्यावर त्यांना आता वक्फची संपत्ती दिसली, त्यानंतर त्यांनी विधेयक आणलं, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी म्हटलंय की, देशातील सर्व संपत्ती 2014 ते 2024 मध्ये उद्योगपतींना विकून झाली. मग त्यानंतर त्यांचं वक्फच्या जागेवर लक्ष गेलं. त्यामुळे त्यांनी वक्फच्या जमिनी विकायचं ठरवल्या, म्हणून आम्ही देश विकल्याची (Politics News) टीका करतो, ती खोटी असं देखील राऊतांनी म्हटलंय. देश विकून झाल्यावर आता वक्फची संपत्ती दिसली, म्हणून विधेयक आणलं असं त्यांनी म्हटलंय.
संजय राऊत यांनी म्हटलंय की, ‘वक्फ बोर्डाकडे सुमारे 2.25 लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे. 2010 मध्ये लालू यादव यांनी म्हटलं होतं की, वक्फ बोर्ड सरकारी जमिनींवर कब्जा करत आहे. वक्फविरुद्ध कडक कायदा करायला हवा. त्यानंतर मनमोहन सिंग यांचे सरकार होते. आता ते मोदी-शहा यांचे आहे. हे विधेयक आणून, या सरकारने नेहमीप्रमाणे हिंदू-मुस्लिम खेळ खेळलाय. विविध ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणे आणि नंतर स्वतःचे ध्येय साध्य करणे. पूर्वी वक्फच्या माध्यमातून जमीन बळकावणारे इतर लोक होते, आता जास्त लोक आहेत. वक्फच्या अफाट मालमत्तेला लक्षात घेऊन भाजपने हे विधेयक आणलंय.
हाच एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट, संजय राऊतांचा हल्लाबोल
सामाजिक सुधारणा, सार्वजनिक सेवा, गरीब मुस्लिमांचे कल्याण हे सर्व खोटं आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केलीय. वक्फच्या जागेवर मुंबईमध्ये अनेक उद्योगपतींचे अलिशान बंगले उभे असून हिंदुत्वाच्या नावाने जमिनी ताब्यात घ्यायच्या असल्याचं राऊतांनी म्हटलंय.
भाजप आणि त्यांचे लोक हिंदुत्व विकण्यात व्यस्त आहेत. त्या बाजारात औरंगजेबापासून अफझल खानपर्यंत सगळं काही आहे. राम मंदिर आणि हिंदुत्वावर तीव्र टीका करणारे नितीश कुमार आणि पासवान या बाजारात उपस्थित आहेत. आज ते भाजपच्या हिंदुत्वाचा झेंडा फडकवत आहेत. त्यांचा ढोंगीपणा अनेक वेळा उघड झालाय, असं देखील राऊतांनी म्हटलंय.