अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज जगभरातील देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ (Gold Silver Price Today) लागू केला आहे. या निर्णयाचे परिणाम जागतिक बाजारपेठेत दिसून येत आहेत. यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. एमसीएक्सवर सोन्याचा भाव 91 हजार 230 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. नंतर यात आणखी वाढ होऊन 91 हजार 423 पर्यंत भाव पोहोचले आहेत. चांदीच्या दरात मात्र घसरण झाल्याचे दिसून आले.
Gold Silver Price Today चांदीच्या दरात मात्र घसरण
याच काळाच चांदीच्या दरात मात्र घट झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर चांदीची किंमत 99 हजार 753 रुपये प्रति किलोग्रॅमच्या तुलनेत 99 हजार 658 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी कमी झाली. सकाळी 9 वाजता एमसीएक्सवर सोन्याच्या दरात 557 रुपये वाढ होऊन दर 91 हजार 285 प्रति तोळा असे झाले. तर चांदीचा भाव 1561 रुपये कमी होऊन 98 हजार 192 रुपये प्रति किलो असा झाला.
जागतिक बाजारात सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ झाली आहे. सोन्या चांदीच्या वायदा किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात वाढीसह उघडला. पण चांदीच्या किंमतीत येथेही मंदी दिसून आली. कॉमेक्सवर सोने प्रति औंस 3196.60 वर उघडले असून सोन्याच्या वायदा किंमती 3196 डॉलर प्रति औंसवर या सर्वकालिक उच्चांकावर पोहोचल्या आहेत. कॉमेक्सवर चांदीचा वायदा 34.95 डॉलरवर उघडला.