महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने (Unseasonal Rain) मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. शेतकऱ्यांच्या फळबागा, शेतातील पिके आणि अन्य कृषी उत्पादने वादळी पावसामुळे नष्ट झाली आहेत. काही भागांत विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच विदर्भातील काही भागातही अशीच परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात बाळापूर अन पातूर तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. अन यामुळे सोंगणीला आलेल्या ज्वारी, कांदा, तीळ, भुईमूग, मूग आणि गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पावसामुळे भाजीपाला पिकांसह फळबागांनाही नुकसान झाले आहे.
Unseasonal Rain पाऊसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
यवतमाळ, वर्धा अन वाशीम जिल्ह्यांमध्येही पावसाचे प्रमाण कमी-जास्त होते. नेर तालुक्यातील नरेंद्र राऊत आणि मेघराज दंदे यांच्या घरावर वीज कोसळून इलेक्ट्रिक साहित्याचे नुकसान झाले. यवतमाळच्या कृष्णापूर व झपाटखेडा भागात शेतकऱ्यांचे उन्हाळी तीळ पिकांचे नुकसान झाले. यासोबतच गोंदिया अन भंडारा जिल्ह्यांमध्ये दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. या ठिकाणी वादळासह पावसाने हजेरी लावली.
Unseasonal Rain वादळी पाऊस व गारपिटीचा इशारा
हवामान विभागाने 4 एप्रिलपर्यंत वादळी पाऊस व गारपिटीचा (Maharashtra Rain) इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्यास सांगितली आहे. कारण या पाऊसामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच धान्य व भाजीपाला पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला. यवतमाळ अन वाशीम जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, मुग, हळद, आंबा आणि निंबू यांसारख्या पिकांचे नुकसान झाले आहे.