https://www.mumbaioutlook.com/wp-content/uploads/2024/04/cropped-author6.jpg

11.5 C
New York

Otur : शाळेतील एकाच बॅचच्या सात डॉक्टरांचा सत्कार

Published:

ओतूर Otur प्रतिनिधी:दि.३ एप्रिल ( रमेश तांबे )

गुणवंत विद्यार्थ्यांचा इतर विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा व शालेय जीवनातच भावी परीक्षांचा पाया भक्कम करावा, 

” गुणवंत विद्यार्थी हीच शाळेची खरी संपत्ती आहे,असे प्रतिपादन प्रदीप गाढवे यांनी केले.

येथील ग्राम विकास मंडळ ओतूरच्या चैतन्य विद्यालयात  सन २०१६-१७ या एसएससी एकाच बॅचमधील सात विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस ही पदवी संपादन केल्याबद्दल संस्थेने व शाळेच्या वतीने, त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी प्रदीप गाढवे हे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सहसचिव पंकज घोलप, मुख्याध्यापिका राजश्री भालेकर, उपमुख्याध्यापक संजय हिरे, पर्यवेक्षक अनिल उकिरडे, शरद वारूळे, प्रा.डॉ.महादू बागुल, ज्ञानेश्वर वळे , शिक्षक प्रतिनिधी संतोष सोनवणे तसेच ग्रामविकास मंडळाचे पदाधिकारी व विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

चैतन्य विद्यालयातील २०१६-१७ या वर्षात दहावी मध्ये शिक्षण घेतलेले आणि नंतर “नीट”ही परीक्षा देऊन एमबीबीएस ला विविध शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळालेले सात विद्यार्थी यावर्षी अंतिम वर्षे एमबीबीएस ही परीक्षा उत्तीर्ण झाले.एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने विद्यालयाचे विद्यार्थी एमबीबीएस तेही मेरिटनुसार आणि विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधून!म्हणून या विद्यार्थ्यांचा संस्थेने व शाळेने एमबीबीएस उत्तीर्ण झालेले विद्यार्थी

आदित्य भाऊसाहेब खाडे (बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे ) यश संजय घाटकर (शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.), संस्कृती शरद वारुळे (हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कुपर रुग्णालय, मुंबई), पुष्पांजली ज्ञानेश्वर वळे (भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे), ऋत्विक मंगेश कोंडार ( शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज सांगली ), अक्षय महादेव शिरसाठ (श्रीमती इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर), प्रणव महादू बागुल (जीएमसी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय केईएम, मुंबई)शुभम पांडुरंग गाडेकर (भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे ) या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित केला होता.

या सर्व विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला. शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पालकांचे वतीने  भाऊसाहेब खाडे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.आदित्य खाडे, डॉक्टर यश घाटकर, डॉ.संस्कृती वारुळे, डॉ . पुष्पांजली वळे यांनी सत्काराला उत्तर देताना विद्यार्थ्यांना सांगितले की,”मोठे यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकटनाही.सातत्यपूर्ण अभ्यास हेच यशाचे गमक आहे. आपले ध्येय निश्चित करून त्यावर फोकस करणे गरजेचे आहे.”शाळेबद्दल व संस्थेबद्दल या सर्वांनी ऋण व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सर्व डॉक्टर्स विद्यार्थ्यांचा परिचय ज्येष्ठ क्रीडा शिक्षक शरद माळवे यांनी करून दिला. 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img