सोलापूरमध्ये भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के जाणवले. आज सकाळी 11 वाजून 22 मिनिटांनी सोलापूरमध्ये (Solapur) भूकंप झाल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (एनसीएस) दिली आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.6 इतकी होती. हे धक्के सौम्य असल्याचं समोर येतंय. भूकंपाचा केंद्रबिंदू (Solapur Earthquake) जमिनीपासून पाच किलोमीटर खाली होता. या भूकंपामुळे नागरिकांत मोठं भीतीचं वातावरण होतं.
याआधी मंगळवारी 1 एप्रिल रोजी भारताच्या पूर्वेकडील भागात, कोलकाता आणि इंफाळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याच वेळी 28 मार्च रोजी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाचे धक्के बिहार, सिलिगुडी आणि भारतातील इतर आसपासच्या भागात (Earthquake News) जाणवले. 2 एप्रिल रोजी सिक्कीममधील नामची आणि त्यापूर्वी1 एप्रिल रोजी लेह लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. 31 मार्च रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग आणि शियोमी, सिक्कीममधील गंगटोक येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. गंगटोकमध्ये सलग दोन दिवस म्हणजे 30 आणि 31 मार्च रोजी भूकंप झाला.
हरियाणामध्ये 29 मार्च रोजी हरियाणातील सोनीपत येथे भूकंपाचे धक्के जाणवले. 29 मार्च रोजी दुपारी 2 वाजून 8 मिनिटांनी वाजता 2.3 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र 10 किलोमीटर खाली होते. 1 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता अरुणाचल प्रदेशात लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.5 इतकी मोजण्यात आली. सुदैवाने भूकंपामुळे जास्त नुकसान झालं नाही. म्यानमारमधील विध्वंसामुळे, भारतातील लोकांनाही मोठ्या भूकंपाची भीती आहे.
Earthquake देशात भूकंपाचे केंद्र कुठे आहेत?
भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, भारताचा सुमारे 59 टक्के भाग भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. भारतातील भूकंप क्षेत्रे चार भागात विभागली आहेत. त्यांना झोन-2, झोन-3, झोन-4 आणि झोन-5 अशी नावे देण्यात आली आहेत. झोन-5 हा सर्वात संवेदनशील भाग आहे. राजधानी दिल्ली झोन-4 मध्ये येते, जो एक चिंताजनक झोन आहे. याचा अर्थ असा की, येथे 7 रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंप देखील येऊ शकतात. जर भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7 असेल तर विनाश निश्चित मानला जातो.