12.1 C
New York

Raj Thackeray : पाकिस्तानी कलाकाराचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात! ‘अबीर गुलाल’ला मनसेचा विरोध

Published:

पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होवू देणार नाही, अशी भूमिका मनसेने (MNS) घेतली आहे. पाकिस्तानी चित्रपट अन् टीव्ही स्टार फवाद खान याचा हिंदी चित्रपट अबीर गुलाल (Abir Gulal Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. भारतात हा चित्रपट 9 मे रोजी प्रदर्शित होतोय. परंतु रिलीज होण्याआधीच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

काही सेकंदाच्या या टीझरमध्ये पाकिस्तानी चित्रपटाची झलक (Raj Thackeray) दिसतेय. आता पाकिस्तानी कलाकार फवाद खान याच्या ‘अबीर गुलाल चित्रपटाविरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. पाकिस्तानी कलाकाराचा ‘अबीर गुलाल’ चित्रपट प्रदर्शित होऊच देणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केलंय.

Raj Thackeray मनसेची भूमिका काय?

सोशल मीडियावर पोस्ट करत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी (Ameya Khopkar) म्हटलंय की, पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, हे इतक्या वेळा सांगूनही काही नासके आंबे उपटतातच. मग त्यांना कचऱ्यात टाकायचं काम मनसैनिकांनाच करावं लागणार आणि आम्ही ते करणार, करत राहणार… ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही. ज्यांना पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घ्यायचंय त्यांनी खुशाल घ्या, पण लक्षात ठेवा सामना आमच्याशी आहे.

‘अबीर गुलाल’ हा पाकिस्तानी कलाकाराचा चित्रपट प्रदर्शित होऊच देणार नाही, असा इशारा मनसेच्या अमेय खोपकर यांनी दिलाय. तर बऱ्याच काळानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान मोठ्या पडद्यावर कमबॅक करतोय. ‘अबीर गुलाल’ चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पाकिस्तानी कलाकारांना खुशाल डोक्यावर घ्या, परंतु सामना आमच्याशी आहे, असा इशाराच अमेय खोपकरांनी दिलाय. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडिया पोस्ट देखील केली आहे.

या चित्रपटात फवाद खानसोबत वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहे. या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. एकंदरीतच फवादच्या चित्रपटाला मनसेचा विरोध वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ‘अबीर गुलाल’ वादाच्या भोवऱ्यात अडकणार असल्याचं दिसतंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img