11.2 C
New York

Latest News Updates : राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर…

Published:

अमरावती विभागामध्ये 24 वर्षात तब्बल 21 हजार 286 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

अमरावती विभाग हा शेतकरी आत्महत्येसाठी गेल्या पंचवीस वर्षापासून बदनाम होत असून 2001 ते फेब्रुवारी 2025 या 24 वर्षात अमरावती विभागातील अमरावती,अकोला ,वाशिम, बुलढाणा ,यवतमाळ या पाच जिल्ह्यात 21 हजार 286 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर राज्यामध्ये 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या एका वर्षाच्या कालावधीत 2706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.यामध्ये अमरावती विभागात सर्वाधिक 1069 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती सुद्धा आता समोर येत आहे.. त्यामुळे अमरावती विभागात शेतकरी आत्महत्येचा आकडा आता प्रशासन आणि शासनाला विचार करायला लावणार आहे.. बदलते हवामान, शेतीचा वाढत चाललेला उत्पादन खर्च व शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने विदर्भातील शेतकरी हा हवालदिल झाला आहे. त्यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

अवकाळी पावसाचा पांढऱ्या कांद्याला फटका बसण्याची भिती

राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण असून या अवकाळी पावसाचा फटका अलिबाग तालुक्यातील पांढऱ्या कांद्याला बसण्याची भिती आहे. पांढऱ्या कांद्याचा काढणीचा हंगाम संपत आला असून रायगडमध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक प्रमाणात पावसाचा शिडकाव होत आहे. यामुळे काढणी करून शेतात वाळत ठेवलेला कांद्याचे नुकसान होत असून शेतकऱ्यांनी आता कांदा उलथवणीचे काम हाती घेतली आहेत. अलिबागचा पांढरा कांदा हा किलो प्रमाणात नाहीतर विणलेल्या घडा प्रमाणे विकला जातो आणि कांद्याची पात भिजल्याने ती विणीला येणार नसल्याने शेतकरी धास्तावला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल

उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल झाले आहेत.

त्यांच्या उपस्थितीमध्ये बीडमध्ये आज युवकांचा मेळावा होणार आहे त्याचबरोबर बीड जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक देखील अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.

नाशिकचे आभाळ पुढील २ दिवस ढगाळ, शहरात उष्ण आणि दमट वातावरण

– गुरुवारी जिल्ह्यातील घाट परिसरासह अन्य काही भागात जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

– २४ तासात कमाल तापमानात ५ अंशांनी घट, तर किमान तापमान २ अंशांनी वाढलं

– मंगळवारी नाशिकमध्ये कमाल ३३.४ अंश सेल्सिअस तर किमान २४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

– वातावरणातील बदलांचा पिकांना फटका बसण्याच्या शक्यतेने बळीराजा चिंतेत

…ते शेतकरी पीकविमा योजनेतून बाद होणार

जळगाव हवामानावर आधारित फक पीकविमा योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतात केळी लागवड केली आहे की नाही. याबाबतची पडताळणी कृषी विभाग व पीकविमा कंपनीकडून सुरू आहे. मात्र, जिल्ह्यातील ६ हजार ७७९ शेतकऱ्यांनी पडताळणी दरम्यान सहकार्य केले नसल्याने, या शेतकऱ्यांचे अर्ज बाद ठरविले जाण्याची शक्यता आहे.याबाबत कृषी विभागाने पीकविमा कंपनीला ५ एप्रिलपर्यंत १०० टक्के पडताळणी करून, आपला अंतिम अहवाल कृषी विभागाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा क्षेत्राची पडताळणीसाठी सहकार्य केलेले नाही, अशा शेतकऱ्यांचे पीकविम्यासाठीचे अर्ज बाद ठरविले जाण्याची शक्यता आहे

राज्यात आजही जोरदार पावसाची शक्यता

बारा जिल्ह्यांना ऑरेंज तर अवघ्या राज्याला येलो अलर्ट…

राज्याला बुधवारी आणि गुरुवारी देखील अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे बुधवारी बारा जिल्ह्यांना ऑरेंज कर अवघ्या राज्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे…

गुरुवारी देखील येल्लो देण्यात आला असून शुक्रवारपासून पाऊस कमी होईल.

असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे…

ऑरेंज अलर्ट..

पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती चंद्रपूर.

जालन्यात अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका,काढणीस आलेला गहू आणि मका पीकाच नुकसान..

जालन्यातील घनसांवगी तालुक्यातील शेवगळ आणि परिसरात अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील मक्का आणि गहू पिकाच मोठा नुकसान झालं आहे. घनसावंगी तालुक्यातील शेवगळ आणि परिसरात सकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला आणि या पावसामुळे गहू आणि मक्का पिकाच मोठ नुकसान झालं आहे. काढणीला आलेला गहू आणि मका पीक अवकाळी पावसामुळे आडवं झाल आहे.दरम्यान या बेमोसमी अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला असून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करत आहे

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img