18.3 C
New York

Sanjay Raut : संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या, हा शोध पंतप्रधान मोदींनी कुठून लावला

Published:

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या म्हणजे संघाने नेमकं काय केलं? असा रोखठोक सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे. देश 150 वर्षे इंग्रजांच्या ताब्यात होता, तेव्हा महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, भगतसिंग, लाल बहादूर शास्त्री, स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांच्याविरोधात लढले. यात संघ कुठेच नव्हता. तेव्हा संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या, म्हणजे नेमकं काय केलं, असा सवाल राऊतांनी केला आहे. ते मुंबईत माध्यमांसोबत बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढी पाडव्याच्या दिवशी नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या रेशीम बागेत गेले. डॉ. हेडगेवार यांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर आयोजित सभेत पंतप्रधानांनी हिंदुस्थान आता गुलामगिरीची मानसिकता सोडून पुढे जात आहे. राष्ट्रगौरवाचे नवे अध्याय लिहिले जात आहेत. गुलामगिरीच्या विचाराने इंग्रजांनी बनवलेली दंड संहिता आता न्याय संहिता बनली आहे. देश विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या. असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाने अक्षेप घेतला आहे. खासदार राऊत म्हणाले की, तुम्ही लोकांना अंधभक्त करत आहात. वेडं करत आहात. एक दिवस हा वेड्यांचा देश, खोटारड्यांचा देश अशा यादीत यायचा, अशी भीती देखील संजय राऊत यांनी व्यक्त केली.

Sanjay Raut पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वारसदार महाराष्ट्रातील असणार

खासदार संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार हा महाराष्ट्रातील असेल आणि तो संघ ठरवेल असं वाटत आहे. संघाची चर्चा ही बंद दाराआड होते. शक्यतो बाहेर येत नाही, परंतू संघाच्या चर्चेतून काही संकेत मिळत असतात, असेही राऊतांनी म्हटले आहे. 75 वर्षांची वयोमर्यादा पंतप्रधान मोदींनीच तयारी केली आहे. तसेच भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळही संपला आहे. त्या दृष्टीनेही विचार सुरु आहे. त्यामुळेच 11 वर्षानंतर मोदी हे संघाच्या मुख्यालयात आले असल्याचा दावाही ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षही संघ ठरवेल

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षासाठीही संघाची भूमिका ठरली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हटले होते की, आम्हाला संघाची गरज नाही. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची ही भूमिका अर्थात पंतप्रधान मोदींचीची भूमिका असते, असे सांगत संजय राऊत म्हणाले की, मोदींना 11 वर्षानंतर संघाच्या मुख्यालयात जावे लागते, यावरुनच हे स्पष्ट होते की, भाजपचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष देखील संघच ठरवेल असे दिसते.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या वारसदाराचा मुद्दा उपस्थित करतुन नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. पंतप्रधान झाल्यापासून मोदी कधीही संघाच्या मुख्यालयात आले नव्हते. 2024 निवडणुकीपूर्वी पक्षाध्यक्ष नड्डा यांचे संघाची आता आम्हाला गरज नाही, याचीही चर्चा झाली होती. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकट्याला 272 चा आकडा गाठता आला नाही. एनडीएतील घटक पक्षांच्या सहकार्याने भाजपला केंद्रात सत्ता स्थापन करावी लागली होती. यासर्व पार्श्वभूमीवर मोदींचा नागपूर दौरा आणि आता संजय राऊत यांनी त्यांच्या वारसदाराचा मुद्दा उपस्थित करुन नवीन चर्चा सुरु केली आहे.

वडील जिवंत असताना…

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत घरात वडील जिवंत आहेत, तो पर्यंत वारसदाराची चर्चा करण्याची भारतात पंरपरा नाही, त्यामुळे मोदींचा वारसदार कोण, ही चर्चा निरर्थक असल्याचे त्यांनी नागपूरमध्ये बोलताना म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img