19.1 C
New York

 Saibaba Sansthan Yojna :  साईभक्तांना मिळणार तब्ब्ल ‘इतक्या’ लाखापर्यंत विमा संरक्षण

Published:

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शिर्डीच्या साईबाबा संस्थानने भक्तांसाठी एक(Saibaba Sansthan Yojna) महत्त्वाची घोषणा केली आहे. देशभरातून शिर्डीला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी आता सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ५ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळणार आहे. ही योजना साईभक्तांना दिलासा देणारी ठरणार आहे.

हिंदू नववर्षाच्या निमित्ताने साईबाबा संस्थानने हा निर्णय घेतला असून, शिर्डीला दर्शनासाठी येताना किंवा परत जाताना जर भाविकांचा अपघात झाला, तर त्यांच्यावर उपचाराचा खर्च अथवा मृत्यूसोबत संबंधित नातेवाईकांना ५ लाख रुपये मिळणार आहेत. ही सुविधा देशभरातील सर्व साईभक्तांसाठी लागू आहे.

 Saibaba Sansthan Yojna अपघातग्रस्त भाविकांना मोठा आधार

शिर्डीत दरवर्षी लाखो साईभक्त दर्शनासाठी येतात. काहीजण रेल्वेने, काहीजण बस किंवा खासगी गाड्यांमधून, तर काहीजण पायी शिर्डी गाठतात. या प्रवासादरम्यान काही वेळा अपघात होण्याची शक्यता असते. अशा प्रसंगी उपचारासाठी आर्थिक मदत नसल्यानं भाविकांच्या कुटुंबावर आर्थिक ताण येतो. हीच बाब लक्षात घेऊन साई संस्थानने विमा संरक्षणाची योजना साकारली आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशीच या योजनेची अधिकृत घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे साईभक्तांचा संस्थानवरील विश्वास अधिक दृढ होईल. अपघाताच्या वेळी भाविकांना त्वरीत मदत मिळावी, हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.

 Saibaba Sansthan Yojna साईसंस्थानचा सामाजिक दृष्टिकोन

या योजनेतून साई संस्थान केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक जबाबदारीही पार पाडत असल्याचं स्पष्ट होत आहे. भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी घेत त्यांना आर्थिक आधार देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. भाविकांनी आता साईदर्शनासाठी जाताना मनात भीती न ठेवता निर्धास्तपणे प्रवास करू शकतील.

संस्थानकडून लवकरच योजनेचा अधिकृत फॉर्म, पात्रता, आणि अर्ज प्रक्रियेची माहिती जाहीर केली जाणार आहे. ही विमा योजना दरवर्षी लाखो साईभक्तांसाठी फायदेशीर ठरेल आणि देशभरात इतर धार्मिक संस्थांसाठीही प्रेरणा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img