8 C
New York

Narendra Modi : जिथे सेवा आहे, तिथे स्वयंसेवक… पंतप्रधान मोदींचे नागपुरात गौरवोद्गार

Published:

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज रविवारी नागपूर दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेत. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरात माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नवीन इमारतीची पायभरणी करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा गौरव केला. जिथे सेवा आहे, तिथे स्वयंसेवक आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी गौरवोद्गार काढले. स्वयंसेवकांना सेवा, संस्कार आणि साधना या मूल्यांमुळेच प्रेरणा मिळते, असेही मोदींनी म्हटले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रवासाबद्दल आणि १०० वर्षाचाही उल्लेख केला. नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या रूपात एका तीर्थक्षेत्राची स्थापना होत आहे. माधव नेत्रालयाने अनेक दशकांपासून लाखो लोकांची सेवा केली आहे. आता नवीन परिसरामुळे या सेवाकार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. या सेवाकार्यात योगदान देणाऱ्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

माधव नेत्रालय आरोग्य क्षेत्रात याच प्रयत्नांना पुढे नेत आहे. गरीब आणि वयोवृद्ध लोकांना उपचारांची चिंता सतावू नये, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आयुष्मान भारत योजनेमुळे कोट्यावधी लोकांना मोफत आरोग्य सुविधा मिळेल. आज भारताचा सन्मान जगात वाढत आहे. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीत अनेक आक्रमणे झाले. देशाला मिटवण्याचे क्रूर प्रयत्न झाले. पण आपली ज्योत सतत तेवत राहिली. यासाठी वेळोवेळी आंदोलने झाली आणि त्यापैकीच भक्ती आंदोलन एक महत्त्वाचे उदाहरण आहे. आपल्या संतांनी राष्ट्रीय चेतनेला नवी ऊर्जा दिली. स्वामी विवेकानंदांनी निराश झालेल्या समाजाला जागे करून आशेचा संचार केला. गुलामगिरीच्या काळात डॉ. हेडगेवार यांनी नवीन विचार दिला. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एका महान वटवृक्षाप्रमाणे जगासमोर उभा आहे. हा केवळ एक सामान्य वृक्ष नसून, भारताच्या अमर संस्कृतीचा अक्षयवट आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक संस्कार आहे, जो अंतर्दृष्टी आणि बाह्यदृष्टी दोन्हीसाठी कार्य करत आहे. बाह्य दृष्टीने माधव नेत्रालयाचा जन्म झाला, तर अंतर्दृष्टीने संघाला सेवेचा पर्याय बनवले आहे. ही सेवा, संस्कार आणि साधना पिढ्यानपिढ्या प्रत्येक स्वयंसेवकाला प्रेरणा देत आहे. त्याला गतिमान ठेवते आणि कधीही थकू देत नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img