11.6 C
New York

Manoj Jarange Patil : भाषण करतानाच मनोज जरांगे पाटील कोसळले, स्टेजवरच प्रकृती खालावली

Published:

मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यासंदर्भात मोठी बातमी समोर आलीय. बीडमध्ये (Beed) कार्यक्रमादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. भाषण करत असताना त्यांना स्टेजवरतीच चक्कर आली. त्यामुळे ते जागेवरच खाली बसले. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाषण करताना अचानक मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली.

भाषण सुरू असतानाच मनोज जरांगे यांना अस्वस्थ (Manoj Jarange Patil Health Deteriorated) वाटायला लागलं. त्यामुळे त्यांनी काही वेळ भाषण थांबवलं. भाषण संपल्यानंतर तातडीने मनोज जरांगे यांना रुग्णवाहिकेनं हॉस्पिटलला नेण्यात आलंय. बीडमधील शिक्षक, (Beed News) प्राध्यापक, डॉक्टर, केमिस्ट, वकील, इंजिनिअर आणि कर्मचारी संघटनाचा आज बीडमध्ये मेळावा होता. यावेळी व्यासपीठावर मनोज जरांगे यांच्यासह धनंजय देशमुख देखील उपस्थित होते. परंतु भाषण सुरू केल्यानंतर अचानक जरांगे पाटलांना अस्वस्थ वाटायला लागलं.

त्यामुळे मनोज जरांगे यांनी मध्येच भाषण थांबवलं. मला शब्दही फुटत नाही, असं म्हणत जरांगेंनी मध्येच भाषण थांबवलं होतं. त्यानंतर त्यांनी थोडावेळ थांबून पुन्हा भाषणाला सुरूवात केली होती. जरांगे यांची प्रकृती थांबावल्याने कार्यकर्त्यांची मोठी धांदल उडाली. बीडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. कार्यकर्त्यांनी तातडीने जरांगेंना रूग्णालयात दाखल केलंय. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं समोर येतेय.

देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम सांगताना व्यासपीठावर मनोज जरांगे पाटील अन् धनंजय देशमुख, उपस्थित महिला असे सगळेच गहिवरले होते. यावेळी भावावरील अन्याय सांगताना धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले होते. संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी फासावर जाईपर्यंत शांत बसणार नाही. मराठा समाजाने कायम एकजूट ठेवावी, असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज बीडमध्ये केलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img