केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central govt employees) एक आनंदाची बातमी दिली आहे. खूप काळापासून चर्चेत असलेला सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने याला मान्यता दिली आहे. कर्मचाऱ्यांना आतापर्यंत 53 टक्के महागाई भत्ता मिळत होता. आता त्यात वाढ होऊत तो 55 टक्के एवढा झाला आहे. ज्या महागाई भत्त्यातील वाढीची केंद्रीय कर्मचारी वाट पाहात होते, ती प्रतीक्षा आता संपली आहे. बराच काळ चर्चेत असलेली केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील वाढीचा निर्णय अखेर झाला आहे. दोन टक्क्यांची वाढ होऊन आता हा महागाई भत्ता 55 टक्के एवढा झाला आहे. (central cabinet approves 2 percent da hike for central govt employees)
केंद्र सरकारने वर्षभरात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. यापूर्वी जुलै 2024 मध्ये या भत्त्यात वाढ करण्यात आली होती. त्यावेळी महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53 टक्के करण्यात आला होता. महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे जवळपास 1 कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. आपल्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय कर्मचारी बऱ्याच काळापासून करत होते. मात्र, ही वाढ दोन टक्क्यांची असेल असे अंदाज आधीपासूनच बांधले जात होते.
Central govt employees केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी केली घोषणा
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या वाढीला दुजोरा दिला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2 टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही वाढ पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. सरकारी आकड्यांनुसार, महागाई भत्ता 3 ते 4 टक्क्यांनी वाढतो. यापूर्वी देखील सरकारने या भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ केली आहे.
कोविडच्या काळात सरकारने सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता थांबवला होता. जानेवारी 2020 पासून जून 2021 पर्यंत 18 महिने केंद्रीय कर्मचाऱ्यांना कोणताही महागाई भत्ता दिला नव्हता. त्यामुळे कर्मचारी या काळातील ऍरिअर्सची मागणी करत होते. सरकार दरवर्षी महागाई भत्त्यात दोन वेळा वाढ करते. एक वाढ जानेवारी ते जून या कालावधीसाठी तर दुसरी वाढ ही जुलै ते डिसेंबर या काळासाठी असते.
Central govt employees महागाई भत्ता काय असतो?
सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराशिवाय अनेक फायदे मिळत असतात. अनेक भत्ते देखील त्यात असतात. वाढत्या महागाईचा विचार करून कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो. ज्यायोगे त्यांना या महागाईचा त्रास होऊ नये.