12.6 C
New York

BCCI Updates : बीसीसीआयच्या केंद्रीय कराराबद्दल मोठे अपडेट्स

Published:

बीसीसीआयच्या (BCCI Updates) केंद्रीय कराराबद्दल (Cricket News) मोठे अपडेट्स समोर आले आहेत. नवीन केंद्रीय करारात अनेक खेळाडूंना संधी मिळू शकते, तर अनेक खेळाडू कराराबाहेर असू शकतात. 29 मार्च रोजी बीसीसीआयची बैठक होणार आहे, ज्यामध्ये गौतम गंभीर देखील सहभागी होणार आहेत. बीसीसीआयच्या केंद्रीय करारात खेळाडूंना ग्रेड ए+, ए, बी आणि सी श्रेणींमध्ये स्थान दिले जाईल. वेगवान गोलंदाजांनाही विशेष करार मिळू शकतात, अशी माहिती मिळतेय. श्रेयस अय्यर परतू शकतो. याशिवाय, ईशान किशनचा पुन्हा केंद्रीय करारात समावेश करण्याचा विचार केला जाऊ शकतो. अक्षर पटेल यांना पदोन्नती मिळू शकते. वरुण चक्रवर्ती, अभिषेक शर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांनाही केंद्रीय करारात समाविष्ट केले जाऊ शकते.

बीसीसीआय लवकरच खेळाडूंची आगामी सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्ट जाहीर करू शकते. गेल्या वेळी बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीतून वगळण्यात आलेला युवा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पुनरागमन करू शकतो अशी अपेक्षा आहे. पण इशान किशनबद्दल अजूनही शंका आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालावर नजर टाकली, तर या तिन्ही खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्ट ए प्लस श्रेणीत ठेवण्याची चर्चा आहे. अहवालात असं सांगण्यात आलंय की, या तिन्ही खेळाडूंना जसप्रीत बुमराहसह एकाच श्रेणीत ठेवण्यात येईल.

येत्या शनिवारी 29 मार्च 2025 रोजी बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या उपस्थितीत एक बैठक होणार आहे. यादरम्यान, विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यासारख्या मोठ्या नावांवरही चर्चा होईल. सध्या हे तिन्ही खेळाडू फक्त दोनच फॉरमॅट कसोटी आणि एकदिवसीयमध्ये खेळत आहेत.

भारतीय संघात परतल्यानंतर श्रेयस अय्यरची कामगिरी कौतुकास्पद आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. याशिवाय, आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व करतानाही तो चांगली कामगिरी करताना दिसत आहे. स्टार खेळाडूंव्यतिरिक्त, ‘मिस्ट्री स्पिनर’ वरुण चक्रवर्ती, अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी आणि अभिषेक शर्मा हे देखील यावेळी बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीत समाविष्ट होण्याची चर्चा आहे.

ए प्लस श्रेणीमध्ये रिटेनरशिप फी 7 कोटी रुपये आहे, तर ए श्रेणीमध्ये 5 कोटी रुपये आहे. ग्रेड बी आणि ग्रेड सी मध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना अनुक्रमे 3 कोटी आणि 1 कोटी रुपये दिले जातात. मुख्य प्रशिक्षक आणि सचिव (देवजीत सैकिया) यांच्याशी सल्लामसलत करून राष्ट्रीय निवड समितीने केंद्रीय करार तयार केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img