18.8 C
New York

Sanjay Raut : कुणाल कामरा प्रकरणावरून संजय राऊतांनी पुन्हा डिवचले

Published:

औरंगजेबाची कबर, दिशा सालियान आणि कुणाल कामरा या भोवतीच राज्यातील राजकारण गेल्या काही दिवसात फिरत आहे. या मुद्यांचे राजकीय भांडवल करण्यात येत असल्याचा आरोप विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येतो. तर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज झालेल्या पत्र परिषदेत याच मुद्यावरून सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला. शिंदे गटावर त्यांनी खरपूस टीका केली. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नियम पाळला जावा अशी मागणी केली. त्यांनी कुणाल कामरा प्रकरणावरून शिंदे गटाला चांगलाच टोला लगावला.

Sanjay Raut ते रेड्याचे दूध काढू शकतात

कुणाल कामरा याच्या विंडबन गीताने म्हणा अथवा कवितेने राज्यातील वातावरण चांगलेच तापले. त्याने शिवसेना फुटीवर केलेले भाष्य अनेकांच्या जिव्हारी लागले. त्यावरून राज्यात एकच खळबळ उडाली. कुणाल कामरा याच्याविरोधात हक्कभंग आणण्याची तयारी करण्यात येत आहे. दरम्यान या सर्व प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली.

कुणाल कामरा याच्यावर हक्क भंग आणत असतानाच त्याचे युट्यूब चॅनलही तपासण्याची मागणी करण्यात येत असल्याच्या प्रश्नावर राऊतांनी जोरदार बॅटिंग केली. शिंदे गटाचे नेते कोणतीही मागणी करू शकतात. शिंदे गटाला मागणी करायला काहीच जात नाही. ते रेड्याचे दूध काढू शकतात आणि ते बैलाचे दूध काढू शकतात, अशी बोचरी टीका राऊतांनी केली. या देशात कायदा आहे आणि काही प्रमाणात आमच्या सारख्या लोकांनी स्वातंत्र्य टिकवून ठेवले आहे, असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut त्यांना शाहांच्या पलीकडे देश दिसत नाही

हा देश खूप मोठा आहे. पण शिंदे गटाला त्यांचा देश अमित शहा यांच्या पलिकडे दिसत नाही, असा चिमटा राऊतांनी काढला. जोपर्यंत अमित शहा यांचे छत्र त्यांच्या डोक्यावर आहे, तोपर्यंत त्यांची अशी भाषा चालेल. पण रामकृष्ण ही गेले, तसे मोदी-शहा पण जातील-येतील इतके लक्षात ठेवा. इतकाच इशारा शिंदे गटाने लक्षात ठेवावा असे राऊत म्हणाले. देशात कायद्याचे राज्य आहे. शिंदे गटाने कायद्याच्या मदतीने कारवाई करावी असे ते राऊत म्हणाले.

Sanjay Raut ते राजकारण त्यांना लखलाभ

यावेळी राऊतांनी दिशा सालियान प्रकरणावर पण भाष्य केले. तो दिशा सालियान आणि यांच्या घरातला प्रश्न आहे आम्हाला त्याचं राजकारण करायचं नाही, असे ते म्हणाले. तिच्या वडीलांना हाताशी धरून जे राजकारण करत आहेत ते त्यांना लखलाभ असे ते म्हणाले. आम्ही समर्थ आहोत आदित्य ठाकरे समर्थ आहेत. या विषयाचा राजकारण करून जे या महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या कुटुंबावर चिखल फेक करू इच्छिताच आणि पुन्हा बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावू इच्छितात त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत, अशी टीका त्यांनी केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img