केंद्र सरकारने 2025-26 साठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात टीडीएसशी (New Income Tax Rules) संबंधित नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली होती. तर 1 एप्रिल 2025 पासून (1 April 2025) या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या बदलांमुळे लाभांश, लॉटरी जिंकणे, ब्रोकरेज, डिजिटल मालमत्तेची विक्री, भाडे आणि व्यावसायिक सेवांवरील करांचे नियम बदलणार आहे ज्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे.
New Income Tax Rules ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांना होणार फायदा
1 एप्रिलपासून जर तुम्ही कोणत्याही एका व्यवहारावर 10,000 रुपयांपेक्षा जास्त कमाई केली तर तुमचा टीडीएस कापला जाईल. यापेक्षा कमी उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. या बदलाचा सर्वात जास्त फायदा ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांना होणार आहे. जर तुम्ही देखील दररोज ऑनलाइन गेम खेळत असाल आणि कमी पैसे जिंकत असाल तर आता कर कापला जाणार नाही.
1 लाख रुपयांपर्यंतच्या व्याज उत्पन्नावर कोणताही कर नाही
1 एप्रिलपासून एक लाख रुपयांपर्यंतच्या व्याज उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक एफडी, बँक व्याज इत्यादीवरील व्याजावर टीडीएस फक्त 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तरच लागू होणार आहे. यापूर्वी ही मर्यादा 50,000 रुपये होती.
New Income Tax Rules कर संबंधित नियमांचे पालन करणे सोपे होणार
लाभांश उत्पन्नावरील टीडीएस मर्यादा 5000 रुपयांवरून 10,000 रुपये करण्याचा बदल शेअर बाजारात कमी प्रमाणात गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तर दुसरीकडे कंपन्यांना कर संबंधित नियमांचे पालन करणे सोपे जाणार आहे आणि याच बरोबर लॉटरी, गेम, घोड्यांच्या शर्यती इत्यादींमधून मिळणाऱ्या उत्पन्नाबाबतही 1 एप्रिलपासून बदल होणार आहे. यापूर्वी संपूर्ण आर्थिक वर्षात अशा उत्पन्नाची मर्यादा 10,000 रुपये होती. पण आता ते प्रत्येक व्यवहारासाठी 10,000 रुपये करण्यात आले आहे.